रब्बी हंगामासाठीही पीकविमा योजना लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:38 AM2019-11-30T00:38:52+5:302019-11-30T01:06:06+5:30

खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात सुरू असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील रब्बी हंगामासाठी पुढे लागू करण्यात आलेली आहे. यासाठी पीक क्षेत्र आणि पिकांची निश्चिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे २०१९-२० रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळणार आहे. याचा लाभ नाशिक जिल्ह्णातील शेतकºयांना होणार आहे.

Crop insurance scheme is applicable for Rabi season | रब्बी हंगामासाठीही पीकविमा योजना लागू

रब्बी हंगामासाठीही पीकविमा योजना लागू

Next
ठळक मुद्देपीक निश्चिती : शेतकऱ्यांना परवडेल असा विमादर

नाशिक : खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात सुरू असलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील रब्बी हंगामासाठी पुढे लागू करण्यात आलेली आहे. यासाठी पीक क्षेत्र आणि पिकांची निश्चिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे २०१९-२० रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळणार आहे. याचा लाभ नाशिक जिल्ह्णातील शेतकºयांना होणार आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकºयांचा खरीप हंगाम वाया गेला, तर रब्बी हंगामही उशिरा सुरू झाला आहे. शेतकºयांना शासनाकडून आर्थिक भरपाई देण्यास सुरुवात झालेली आहे. उशिरा सुरू झालेला रब्बीचा हंगाम आणि रब्बीचे घटलेले क्षेत्र यामुळे शेतकºयांना पिक विम्याचा दिलासा मिळणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड, प्रतिकूल वातावरणाचा परिणाम यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकºयांना विमा संरक्षण मिळणार आहे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य यामुळे आबाधित राखण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण देण्यात आले आहे. गहू (बागायत), रब्बी, ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा या पिकांसाठी शेतकºयांना भरपाई मिळू शकते. याशिवाय भात पिकालाही संरक्षण बहाल करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०१९-२० या हंगामात राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील एका जिल्ह्णामध्ये ग्रामपंचायत स्तरावर मुख्य पिकासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णात रब्बीतील ज्वारी या मुख्य पिकावर प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविली जाणार आहे. शेतकºयांवर विमा हफ्ता भार कमी करण्यासाठी शासनाने रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकासाठी ५ टक्के इतका विमादर किमान ठेवला आहे. पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यंदा जोखमीची व्याप्ती वाढविण्यात आलेली आहे. त्यानुसार हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र, जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान या बाबी जोखमीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

Web Title: Crop insurance scheme is applicable for Rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती