पाण्याअभावी पिके करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 04:25 PM2018-11-02T16:25:01+5:302018-11-02T16:25:50+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्यात गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने, नदी-नाले आटले असून, विहीरींनी तळ गाठला असल्याने, दुष्काळी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
वरखेडा : दिंडोरी तालुक्यात गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने, नदी-नाले आटले असून, विहीरींनी तळ गाठला असल्याने, दुष्काळी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील भात, नागली, मका, कुळीद, उडीद, सोयाबीन, टोमॅटो या प्रमुख पिकांचे पाण्याअभावी नुकसान झाले आहे.तर व पुर्व भागातील ढकांबे, पिंपळणारे , खतवड व तळेगाव परिसरातील भाजीपाला पीकाला सिंचनासाठी पाणी नसल्याने शेतातच सोडून देण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की ओढवली आहे. या वर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यवृष्टी झालेली असतानाही तालूका दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
ढकांबे येथील शेतकरी हरिदास बोङके यांनी एकूण सहा एकर क्षेत्रा पैकी सुमारे तीन ते साङे तीन एकरात कोबीचे पीक घेतले आहे.आजपर्यंत दीङ ते दोन लाख रूपये खर्च केला आहे . उर्वरि क्षेत्रात टॉमेटोचे पिक घेतलेले असून, आजमितीस काढणीस आलेल्या पिकांना पाणी नसल्याने शेतातच उभे पीक सोङून देण्याची वेळ आली आहे.
---------------------
आम्ही टोमॅटो कोबी व फ्लॉवरचे पीक घेतले असून, सद्यस्थितीत पाण्याअभावी पीके करपले आहे. एकीकडे बाजार,भाव नसल्याने त्यातच भर म्हणजे पाण्या अभावी पिके कोमजल्याने अतिशय दयनीय अवस्था झाली असून, करण्यात आलेला खर्च निघनेही कठिण झाले आहे.
-हरिदास बोडके, शेतकरी