अतिवृष्टीने दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 01:33 AM2021-10-15T01:33:05+5:302021-10-15T01:34:25+5:30

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजार ९१९ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधितांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ कोटींच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला आहे.

Crops on 1.5 lakh hectares due to excess rainfall in water | अतिवृष्टीने दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

अतिवृष्टीने दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

googlenewsNext
ठळक मुद्देपंचनामे पूर्ण : १४७ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

नाशिक : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजार ९१९ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधितांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ कोटींच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला आहे.

सप्टेंबरअखेरच्या चरणात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे जिरायत, बागायत वार्षिक फळबाग व बहुवार्षिक फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेषत: मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला, तर येवला तालुक्यातही नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यात ५८ हजार २९६ हेक्टर, तर नांदगावमधील ५२ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर पाणी फिरले. येवला तालुक्यातील ५६ हजार ५५२ हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

मालेगाव, नांदगाव तालुक्यांसह येवला, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा या तालुक्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. भुईमूग, सोयाबीन, कांदे, बाजरी, मका, तांदूळ, नागली ही पिके आडवी झाली; तर केळी, चिक्कू, निंबू, आंबा, द्राक्ष, डाळिंब फळपिकांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. राज्य शासनाने युध्दपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचनाम्याला गती देण्यात आली. आठ तालुक्यांतील ६४७ गावांतील १ लाख ७१ लाख हेक्टरवरील जिरायत, बागायत, वार्षिक फळबाग व बहुवार्षिक फळबागांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठवला असून, १४७ कोटी २१ लाखांची मदत मागितली आहे.

 

--इन्फो--

बाधित नुकसानभरपाईची मागणी (निधी लाखात)

१) जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र : ८९५७.०१

२) बागायत पिकाखालील बाधित क्षेत्र : ४३६७ : ९८

३) वार्षिक फळपिके : १८.३५

४) बहुवार्षिक फळपिके : १३७७.९९

एकुण : १४७२१.३३

--इन्फो--

दोन लाख शेतकरी बाधित

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना बसला. सर्वाधिक नुकसान हे जिरायती पिकांखालील क्षेत्राचे झाले, तर वार्षिक फळपिकांनादेखील काही प्रमाणात फटका बसला. बागायत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास १, ७१, ८६७ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

Web Title: Crops on 1.5 lakh hectares due to excess rainfall in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.