धुके, पाऊस, ढगाळ वातावरणामुळे पिके संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 06:14 PM2020-12-14T18:14:38+5:302020-12-14T18:16:06+5:30
जळगाव नेऊर : खरीप पिकांच्या संकटातून शेतकरी सावरतो ना सावरतो तोच येवला तालुक्यात सध्या चार-पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस, दाट धुके व मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा व भाजीपाला अशा रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत असून, शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

या वातावरणामुळे पिके जगविण्यासाठी औषध फवारणी करून शेतकऱ्यांचा खर्च भरमसाट वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा रोपे नसल्याने भाजीपाला केला होता; पण त्यातूनही खर्चदेखील वसूल न झाल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्यावर नांगर फिरवला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके हे शेतातच सोडून दिलेले आहे.
आता मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस, दव आणि धुके पडत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे, तर अनेक शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारणी करूनही भाव मिळत नसल्याने वैतागून भाजीपाला पिके सोडून दिलेले आहे. तसेच पुढील दिवसांमध्ये थोड्या फार प्रमाणात असलेल्या पोळ कांदा काढणीस सुरुवात होणार आहे; परंतु जर पावसाचे आगमन झाले तर कांदा सडून जाण्याची झाली आहे. सतत बदलणारे हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी जास्त प्रमाणात वाढली आहे.
गेली चार-पाच दिवसांपासून सतत पडणारे धुके, दव व पाऊस यामुळे कांदा पीक करपा रोगाच्या विळख्यात सापडले असून, औषधे फवारणी करूनही रोगट वातावरण साथ सोडायला तयार नसल्याने मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यामुळे कांदा पिकावर करपा येऊन कांदा पात करपत आहे.
- नीलेश शिंदे, जळगाव नेऊर.
(फोटो १४ जळगाव नेऊर)
जळगाव नेऊर परिसरात सतत पडणाऱ्या धुके, ढगाळ वातावरणामुळे औषधे फवारणी करताना शेतकरी.