वरुणराजाच्या हजेरीने पिकांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:19+5:302021-07-14T04:17:19+5:30

तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली होती, मात्र यानंतर काही भागात पाऊस तर काही भागात ...

Crops got relief with the presence of Varun Raja | वरुणराजाच्या हजेरीने पिकांना मिळाला दिलासा

वरुणराजाच्या हजेरीने पिकांना मिळाला दिलासा

Next

तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली होती, मात्र यानंतर काही भागात पाऊस तर काही भागात दडी असा पावसाचा एक महिन्याचा प्रवास राहिला आहे. तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस नसतानादेखील मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पिकांची पेरणी करण्याची घाई केली होती. पिके उगवून व ताशी लागली असतानाच पंधरा दिवस पावसाने दडी मारून डोळे वटारल्यामुळे खरिपाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना चिंता सतावत होती. तब्बल पंधरा दिवसांपासून गायब असलेल्या पावसामुळे पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे बहुतांश भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु रविवारी रात्री तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांचा कडकडाटात पाऊस पडला, यामुळे पिकांना जीवदान मिळाले. तालुक्यात कुठे जास्त, तर कुठे कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसामुळे पिकांना तारले असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त होत असून, दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे.

कोट...

साताळी आणि परिसरात दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारी रात्री साडेबारा ते एक वाजेदरम्यान झालेल्या पावसाने पेरणी होणार आहे; मात्र यावर्षी अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने शेतातून पाणी वाहिले नसल्याने नदी-नाले खळखळून वाहिले नाहीत. त्यामुळे नदी-नाल्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान जोरदार पाऊस झाल्यास पाणीटंचाईवर मात होईल.

- भाऊसाहेब कळस्कर, शेतकरी, साताळी

फोटो- १२ जळगावनेऊर १

जळगाव नेऊर परिसरात सुरू असलेली पेरणी.

120721\12nsk_18_12072021_13.jpg

जळगाव नेऊर परिसरात सुरू असलेली पेरणी

Web Title: Crops got relief with the presence of Varun Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.