पावसाअभावी खरिप हंगामातील पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:18+5:302021-07-08T04:11:18+5:30

▪️नागली वरईची रोपे करपली : भाताची लावणी खोळंबली नागली, वरईची रोपे करपली : त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात भाताची लावणी खोळंबली ...

Crops in kharif season in crisis due to lack of rains | पावसाअभावी खरिप हंगामातील पिके संकटात

पावसाअभावी खरिप हंगामातील पिके संकटात

Next

▪️नागली वरईची रोपे करपली : भाताची लावणी खोळंबली

नागली, वरईची रोपे करपली : त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात भाताची लावणी खोळंबली

त्र्यंबकेश्वर/ देवगाव : जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात वरूणराजाने अवकृपा केल्याने भात नागली व वरईची पिके उन्हामुळे करपू लागल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ्यात पिकांना कडक उन्हाळ्यासारखी परिस्थिती उद्भवल्याने भात, नागली व वरईची रोपे पिवळी पडून संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत.

राज्यात झालेल्या तौक्ते वादळाच्या पावसाने वातावरणात आवश्यक असा ओलावा निर्माण केला होता. त्यानंतर रोहिणींच्या सरीने बळीराजाला दिलासा मिळून त्या जोरावर शेतकऱ्यांनी भात, नागली वरईची पेरणी केली; मात्र पुढील पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक न कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला. मृग व आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीला काहीशा प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची शेती कामांची लगबग सुरू केली.

मात्र त्यानंतर कडक ऊन पडून रोपे पिवळी पडू लागली. देवगावसह वावीहर्ष, श्रीघाट, टाकेदेवगाव, चंद्राचीमेट, आव्हाटे, डहाळेवाडी आदी. परिसरातील गावांमध्ये पिके तयार झाली आहेत; परंतु पावसाअभावी आवणामध्ये पाणी व आवश्यक चिखल, गाळ नसल्याने लावणीची कामे खोळंबली आहेत. पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने देवगाव परिसरातील नागलीचे पीक करपू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यंदाही भात, नागली व वरईच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

----------------------------

जोरदार पावसाची प्रतीक्षा

दरवर्षी जुलै महिन्यात भात व नागलीची लावणी पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. आषाढी एकादशीपर्यंत हमखास संततधार पाऊस सुरू होतो. या आशेवर शेतकऱ्यांनी डोंगर उतारावर नागली रोपांची लावणी करतात; मात्र पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नागलीची रोपे करपली आहेत. आदिवासी भागात भात व नागली या दोन्ही पिकांचे रोपे तयार करून नंतर लावणी केली जात असल्याने एकदा रोपे खराब झाल्यावर दुबार लावणी करणे शक्य नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभराच्या पिकावर पाणी सोडून देण्याची वेळ आली आहे. आदिवासी भागातील भात, नागली, वरई शेती पावसावर तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पावसाळी शेतीवर अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभराच्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

----------------------

पाऊस पडत नसल्यामुळे भात, नागली पिकांची लावणी रखडली आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पाऊस पडण्याची कुठलीच चिन्हे दिसत नाहीत. उलटपक्षी कडक उन्हामुळे तयार झालेली रोपे उन्हाच्या तडाख्याने पिवळी पडून करपत आहे.

- लक्ष्मण देहाडे, बर्ड्याचीवाडी, शेतकरी.

--------------------

देवगाव परिसरात श्रीघाट येथे पावसाअभावी आवनांमध्ये खोळंबलेली लावणी. (०७ देवगाव)

070721\07nsk_9_07072021_13.jpg

०७ देवगाव

Web Title: Crops in kharif season in crisis due to lack of rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.