पिकांना लष्करी अळीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 05:59 PM2019-06-28T17:59:59+5:302019-06-28T18:00:53+5:30

नांदगाव: नायजेरियामध्ये ज्या अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घालत हजारो एकर मकाचे पिक उद्ध्वस्त केले होते. तिचा गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या पश्चिम भागात प्रादुर्भाव आढळून आला असून यंदा या अळीपासून सावध राहण्याचा इशारा तालुका कृषि अधिकारी विजय पवार यांनी दिला आहे.

 Crops to Military Algae Risk | पिकांना लष्करी अळीचा धोका

पिकांना लष्करी अळीचा धोका

Next

पावसाच्या आगमनामुळे पेरणीची तयारी सुरु झाली असून नांदगाव तालुक्यात एकूण खरीप पेरणीच्या ४२ टक्के मका या पिकाची लागवड होते. शेतकरी तयारीला लागला आहे. एकूण ८४ प्रकारच्या पिकांना लष्करी अळीचा धोका संभवतो. आपल्या भागात मका, उस, ज्वारी ही पीके लष्करी अळीच्या आक्र मणाला बळी पडू शकतात. रात्रीत १०० किमी अंतर कापणारी ही अळी आहे. ती ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट इंग्रजी वाय आकाराची खूण असते. यासाठी एकात्मिक व्यवस्थापन सुचवण्यात आले असून खोल नांगरणी, किडीचे पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्याचा वापर करणे, अळीचा नायनाट करण्याच्या उपायांच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी कृषी विभागामार्फत आउट आॅफ क्लासरूमचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title:  Crops to Military Algae Risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.