सुर्य दर्शन होत नसल्याने पिके पडू लागली पिवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 08:26 PM2019-08-07T20:26:35+5:302019-08-07T20:27:10+5:30

खामखेडा : गेल्या पंधरा दिवसापासून आकाशात ढगाळ वातावरण असल्याने ऊन पडत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी सुरु वातील पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. परंतु आर्द्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात पाऊस झाल्याने शेतकऱ्याने या पावसावर खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र या भागात पाऊसाने पुन्हा दांडी मारल्याने पिके पावसाअभावी करपू लागली होती.

The crops started to yellow because of the lack of sunlight | सुर्य दर्शन होत नसल्याने पिके पडू लागली पिवळी

सुर्य दर्शन होत नसल्याने पिके पडू लागली पिवळी

Next
ठळक मुद्देपिकांना खते देऊन नागरी करण्याचे कामे खोळंबली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
खामखेडा : गेल्या पंधरा दिवसापासून आकाशात ढगाळ वातावरण असल्याने ऊन पडत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
चालू वर्षी सुरु वातील पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. परंतु आर्द्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात पाऊस झाल्याने शेतकऱ्याने या पावसावर खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र या भागात पाऊसाने पुन्हा दांडी मारल्याने पिके पावसाअभावी करपू लागली होती.
पुन्हा दुबारा पेरणीचे करावी लागते का याची भीती शेतकºयाला वाटू लागली होती. परंतु मघ्यंतरी थोडया प्रमाणात पाऊस झाल्याने पिके तरारली असली तरी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने व भुर्गभातील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने विहिरीनी अजून पाणी उतरले नाही.
तसेच गेल्या पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊसामुळे सूर्य दर्शन होत नसल्याने मका पिकाची कोळपणी करणे थांबली असल्याने पिकांना खते देऊन नागरी करण्याचे कामे खोळंबली आहे.
या ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम झाला आहे. सूर्य दर्शन होत नसल्याने पिके पिवळी पडू लागले आहे. आणि पिकाची वाढ थाबली आहे. ढगाळ तर वातावरण आहे. परंतु अधून मधून रिमझिम पाऊस सुरु असल्याने व जमीन ओली असल्याने पिकामघ्ये तण तयार झाली आहेत. तेव्हा कधी हे ढगाळ वातावरण जाऊन सूर्यदर्शन होईला याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
या रिमझिम पाऊसामुळे जमीन तयार करता येत नसल्याने पोळ कांद्याची बियाणे टाकता येत नसल्याने कांद्याची लागवड उशिरा होणार की काय याची चर्चा करताना शेतकरी वर्ग दिसून येत आहे.
 

Web Title: The crops started to yellow because of the lack of sunlight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी