पाटणेत अतिवृष्टीने पिके पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:00 PM2020-09-20T17:00:12+5:302020-09-20T17:02:33+5:30
पाटणे: पाटणेसह परिसरात येथे काल शनिवारी (दि.१९) सप्टेंबर रोजी रात्री वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीमुळे सर्वञ पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पिके काढणीस तयार होती परंतु काल रात्रभर अतिवृष्टीने प्रचंड थैमान घालून सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावून नेला. सर्वच पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून मोठे संकट उभे ठाकले आहे.

मका, बाजरी, डाळिंब, कांद्याचे रोपं, नवीन लागवड झालेले कांद्याचे अतोनात नुकसान झाले. परसूल धरणाच्या पाण्याने धोक्याच्या पातळी गाठली आहे. धरणाच्या भिंतीवरून तीन ते चार फुट पाणी वाहत असल्याने धरण परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परसुल नदी दुथडी भरून वाहू लागली असून तसेच गावाजवळील नाल्यांना पुर आल्याने आरोग्य केंद्राजवळील मातीबंधारा पूर्ण भरल्यामुळे पाटणे वाके रस्ता पाण्याखाली गेला असून बंधारा जवळील अरूण धनवट यांच्या खळ्यात पाणी शिरल्याने बाजरीचा चारा व कांद्याचे नुकसान झाले आहे. कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून मदत करण्याची मागणी अरूण धनवट यांनी केली आहे. परसूल नदीला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुर आला. परसुल नदीवरील जागेत गावाच्या जवळ उभारलेल्या तलाठी कार्यालयात पाणी साचले आहे. तातडीने पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.