पाण्याअभावी पिके करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:43 PM2020-07-22T21:43:17+5:302020-07-23T00:58:23+5:30
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात पावसाअभावी पिके करपू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके कोमेजू लागली आहेत.
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात पावसाअभावी पिके करपू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके कोमेजू लागली आहेत. परिसरात मका पिकावर लष्करी अळीने थैमान घातले आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे. परिसरात जोरदार पाऊस झाला नसल्यामुळे ओतूर धरण कोरडे ्रआहे. त्यामुळे मार्कण्डेय नदीस पाणी नसल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. पाण्याअभावी लाल कांद्याची रोपे टाकता आली नाही. तसेच गतवर्षाच्या उन्हाळ कांद्यास दर नसल्यामुळे चाळीतच कांदा सडत आहे. कोरोना महामारीमुळे बळीराजाही संकटात सापडला आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे ते खरीप पिकांना भरत आहेत. मात्र ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांचे मात्र हाल होत आहेत. बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. पुढील आठ दिवसात पाऊस आला नाही तर हाती आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
-----------------------------
मानोरीत पिके धोक्यात
मानोरी : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने ऐन हंगामातील मका, सोयाबीन पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतित झाला आहे. यंदाही मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मक्यावर सातत्याने महागड्या औषधांची फवारणी करावी लागत असल्याने आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.
आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मोठ्या मेहनतीने केलेली मका, सोयाबीन, बाजरी पिकांची लागवड पावसाअभावी धोक्यात आली आहे. उष्मा वाढत असल्याने मका पीक सुकण्यास सुरु वात झाली आहे. पुढच्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास मका, सोयाबीन पीक धोक्यात येणार असून, हजारो रु पयांचा खर्च वाया जाण्याची भीती शेतकरी हृतिक दुघड यांनी व्यक्त केली.