वाहन बाजारपेठेची कोटीच्या कोटी उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:46 AM2018-10-19T00:46:47+5:302018-10-19T00:47:22+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसºयाच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. १८) नाशिकच्या वाहन बाजारात सुमारे ११०० ते १२०० चारचाकी वाहनांची विक्री झाली असून, सुमारे दोन हजाराहून अधिक दुचाकी वाहने विकली गेल्याने वाहन बाजारात जवळपास दीडशे कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले. तर अनेक ग्राहकांनी आपल्या स्वप्नातील घर खरेदीला प्राधान्य दिल्यामुळे सुमारे चारशे ते पाचशे सदनिकांची बुकिंग आणि विक्री झाल्याचा अंदाज घर व जमीन विक्री व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
नामदेव भोर । लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसºयाच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. १८) नाशिकच्या वाहन बाजारात सुमारे ११०० ते १२०० चारचाकी वाहनांची विक्री झाली असून, सुमारे दोन हजाराहून अधिक दुचाकी वाहने विकली गेल्याने वाहन बाजारात जवळपास दीडशे कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले. तर अनेक ग्राहकांनी आपल्या स्वप्नातील घर खरेदीला प्राधान्य दिल्यामुळे सुमारे चारशे ते पाचशे सदनिकांची बुकिंग आणि विक्री झाल्याचा अंदाज घर व जमीन विक्री व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
वाहन बाजार आणि बांधकाम व्यवसायासोबतच सराफ बाजार आणि इलेक्ट्रिक वस्तूंच्या बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली. अनेक ग्राहकांनी तोंडावर आलेल्या दिवाळ सणाच्या तयारीसोबतच लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली. तर आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वस्तूंच्या बाजारात एसी, फ्रीज यांसारख्या गृहोपयोगी वस्तूंबरोबरच टीव्ही, वॉशिंग मशीन, ओव्हन आणि भेटवस्तूमध्ये मोबाइलसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट खरेदीला ग्राहकांचा अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला. एकूणच दसºयाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची वर्दळ वाढल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वेगवेगळ्या व्यवसाय उद्योजकांची लगबग वाढल्याचे दिसून आले. रिअल इस्टेटमध्ये तयार घरांना अधिक मागणी असल्याचे दिसून आले. गंगापूररोड, कॉलेजरोड, इंदिरानगर, गोविंदनगर, नाशिकरोड, उपनगर, रविशंकर मार्ग, अशोका मार्ग भागातील नवनवीन प्रकल्पांमधील तयार फ्लॅट खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून आला. तर अनेक ग्राहकांनी निर्माणाधिन प्रकल्पांमधील सदनिकांनाही पसंती दिली. दसºयाच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकींची डिलिव्हरी मिळून गेल्या १० ते १५ दिवसांपासून अनेकांनी वाहनांची बुकिंग केली होती. त्यामुळे सर्व ग्राहकांना वाहनांची डिलिव्हरी देण्यासाठी वेगवेगळ्या शोरूमचालकांना कसरत करावी लागली. विविध कंपन्यांनी दिलेल्या आकर्षक आॅफर्स, वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य यामुुळे वाहनांची विक्री गतवर्षीच्या नवरात्रोत्सवाच्या तुलनेत १० ते १२ टक्क्यांनी वाढली असून, दसºयाच्या दिवशी बाजारातील सर्व उच्चांक मोडीत निघाल्याचे दिसून आले. दसºयानंतर दिवाळीपर्यंत खरेदीचा हा उत्साह असाच कायम राहील, असा व्यावसायिकांना विश्वास आहे.
सवलतींचा वर्षाव, ग्राहक आकर्षित
दसºयाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या कंपन्यांनी दिलेल्या आकर्षक आॅफर्स ग्राहकांना खरेदीकरिता प्रोत्साहन दिल्याचे दिसून आले. शून्य डाउन पेमेंट, विशिष्ट बँकेचे क्रे डिट कार्ड वापरल्यास अतिरिक्त डिस्काउंट, कॅशबॅक यांसारख्या आॅफर्सची ग्राहकांना भूरळ पडल्याचे दिसून आले. वित्तसंस्थांनी कर्जप्रक्रिया सुलभ केली असून, शंभर टक्क्यांपर्यंतचे कर्ज आणि सुलभ हप्ते यामुळे घर, वाहन आणि सोने खरेदीसोबत गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रिक उपकरणांच्या खरेदीकडे ग्राहकांची पावले वळाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.