दिवाळी सणाच्या काळात कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:22 AM2018-11-12T00:22:58+5:302018-11-12T00:24:22+5:30

दिवाळीतील धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीजच्या मुहूर्तानिमित्त गेल्या पंधरवड्यात बाजारात ग्राहकांचा महापूर पहावयास मिळाला. दिवाळीच्या कालावधीत शहरात सातशेहून अधिक चारचाकी व तीन हजार दुचाकी वाहनांची विक्री झाली. यासोबतच बांधकाम, कापड, फिर्निचर, फटाके, इलेक्ट्रॉनिक्ससह इतर वस्तूंच्या विक्र ीतून नाशिकमध्ये हजार कोटीहून अधिकची उलाढाल झाल्याची माहिती विक्रे त्यांनी दिली.

Crores of turnover during the festival of Diwali | दिवाळी सणाच्या काळात कोट्यवधींची उलाढाल

दिवाळी सणाच्या काळात कोट्यवधींची उलाढाल

Next
ठळक मुद्देबाजारपेठेला झळाळी सोने-चांदीसोबतच वाहन व घर खरेदीला नाशिककरांची पसंती

नाशिक : दिवाळीतील धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीजच्या मुहूर्तानिमित्त गेल्या पंधरवड्यात बाजारात ग्राहकांचा महापूर पहावयास मिळाला. दिवाळीच्या कालावधीत शहरात सातशेहून अधिक चारचाकी व तीन हजार दुचाकी वाहनांची विक्री झाली. यासोबतच बांधकाम, कापड, फिर्निचर, फटाके, इलेक्ट्रॉनिक्ससह इतर वस्तूंच्या विक्र ीतून नाशिकमध्ये हजार कोटीहून अधिकची उलाढाल झाल्याची माहिती विक्रे त्यांनी दिली.
भारतीय परंपरेतील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीला ग्राहकांची स्वप्नातील घर खरेदीसोबतच विविध प्रकारच्या वाहन खरेदीला अधिक पसंती मिळाली. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आर्थिक नियोजनाला प्राधान्य देणाऱ्या नागरिकांकडून मात्र गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने खरेदीला प्राधान्य देण्यात आले.
धनत्रयोदशीच्या एकाच दिवळी शहरात सोने व चांदीच्या दागिन्यांसह चोख सोन्याची बिस्कीटे, नाणी, चांदीची नाणी, भांडी, आणि हिºयाच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने शहरातील सराफ बाजारात सुमारे शंभर कोटींहून अधिकची उलाढाल झाली. हाच ट्रेण्ड लक्ष्मीपूजनालाही दिसून आला. लक्ष्मीपूजनाला दुपारनंतर ग्राहकांनी सोने खरेदी केली. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहनांची डिलिव्हरीही घेतली. त्यामुळे वाहन वितरकांची कसरत झाल्याचे दिसून आले. दिवाळीचे पाचही दिवस रात्री उशिरापर्यंत विविध कंपन्यांच्या वाहनांचे शोरुम्स खुले असल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवापासून रिअल इस्टेटमध्ये वाढलेली मागणी दिवाळीतही कायम असल्याचे दिसून आले.
नाशिकमध्ये तयार सदनिकांसोबतच निर्माणाधीन प्रकल्पांमधील घरांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन विक्र ी दालने, सराफी पेढ्यांना झळाळी मिळाल्याचे दिसून आले. विविध कंपन्यांनी दिलेल्या आकर्षक आॅफर्स, वित्तीय अर्थसाहाय्य यामुुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.

शून्य डाउन पेमेंटचे आकर्षण
शून्य डाउन पेमेंट, विशिष्ट बँकेचे क्र ेडिट कार्ड वापरल्यास अतिरिक्त डिस्काउंंट, कॅशबॅक यांसारख्या आॅफर्समुळे ग्राहकांनी मोठा प्रमाणात खरेदी केली. वेगवेगळ्या बँकांसह अर्थसाहाय्य करणाºया संस्थांनी कर्जप्रक्रि या सुलभ केल्यामुळे तसेच शंभर टक्क्यांपर्यंतचे कर्ज आणि सुलभ हप्ते यामुळे घर, वाहन आणि सोने खरेदीसोबत गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रिक उपकरणांच्या खरेदीकडे ग्राहकांची पावले वळाल्याचे दिसून आले. खरेदीसाठी ग्राहकांनी
क्रे डिट व डेबिट कार्डचादेखील मोठ्या प्रमाणात वापर केल्याने सणाच्या काळात बँका चार दिवस बंद असतानाही त्याचा बाजारपेठेलवर परिणाम झाला नाही.
घरगुती उपकरणांना विशेष पसंती
होम अप्लायन्सेसच्या खरेदीसाठी मेनरोड, शालिमार या मुख्य बाजारपेठेसह सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, सिडको परिसरातील दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. वॉटर बॉटल, चमचे, कुकर, कढई या लहान वस्तूंपासून मिक्सर, फ्रूट ज्यूसर, प्रोसेसरी, ओव्हन, किचन चिमणी, वॉटर प्युरिफायर या वस्तूंनाही मोठी मागणी होती.

Web Title: Crores of turnover during the festival of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.