अन्नपूर्णा मातेच्या दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:35 PM2018-02-26T13:35:22+5:302018-02-26T13:35:22+5:30
त्र्यंबकेश्वर - येथे सुरु असलेला व निल पर्वतावर स्थापित झालेल्या अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात सुरु असलेल्या शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञामध्ये दि २५ पर्यंत सहा लाखातून अधिक आहुती देण्यात आल्या.
त्र्यंबकेश्वर - येथे सुरु असलेला व निल पर्वतावर स्थापित झालेल्या अन्नपूर्णा माता मंदिर परिसरात सुरु असलेल्या शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञामध्ये दि २५ पर्यंत सहा लाखातून अधिक आहुती देण्यात आल्या.यज्ञाच्या सांगतेपर्यंत म्हणजेच २८ फेब्रु.पर्यंत एकूण नऊ लाख आहुती दिल्या जाणार असल्याची माहिती यज्ञाचार्य पंडित कल्याण दत्त शास्त्री, इंदौर यांनी दिली. दरम्यान, अन्नपुर्णा मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. यज्ञाच्या महत्त्वाबाबत सांगताना कल्याण दत्त शास्त्री म्हणाले, शास्त्रानुसार यज्ञाचे मोठे महत्व आहे. यज्ञामुळे पर्यावरण शुद्धी होऊन त्यामुळे चांगला पाऊस पडतो . चांगल्या पावसाने शेतात अन्न धान्यांची निर्मिती होऊन सर्व प्राणीमात्रांचे जीवन चालते. यज्ञ हे भगवान विष्णूचे एक रूप असून उपनिषदानुसार यज्ञ न करणारा तेजहीन होतो. वायुप्रदूषण कमी करण्यास यज्ञ हे एक महत्वाचे साधन असून त्र्यंबकेश्वर येथे होणार हा महायज्ञ सर्वांच्या कल्याणासाठी करण्यात येत आहे. भारताच्या विविध भागातून आलेले १०० यजमान सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरीटेबल ट्रस्टचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज व देशातील ६२५ पंडितांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञात सहभागी झाली आहेत. पूर्णपणे शास्त्रानुसार उभारण्यात आलेल्या ३२ हजार चौरस फूट एवढ्या भव्य यज्ञशाळेत १०० कुंडामध्ये यज्ञात आहुती देत आहेत. गेल्या दहा दिवसांपासुन माँ अन्नपुर्णा मातेचा अन्नदान भंडारा अव्याहत सुरू असुन सकाळ दुपार संध्यकाळ या परिसरातून नागरिक प्रसाद भोजन ग्रहणासाठी येत असतात.