मालेगावी सेतू कार्यालयात दाखल्यांसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 08:42 PM2020-08-12T20:42:29+5:302020-08-13T00:12:34+5:30
पाटणे : दहावी आणि बारावीचे निकाल घोषित झाल्याने पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारे दाखले मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने मालेगावी सेतु कार्यालयात मोठ्या प्रमाणात येत असल्याने गर्दी वाढली आहे.

यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. याठिकाणी कोणाचेही तापमान मोजताना दिसून येत नाही तसेच सॅनेटायझरचाही वापर होताना आढळून आले नाही. कोरोना विषाणूजन्य पार्श्वभूमी असतांना कोणतेही शासकीय नियम पाळले सेतू केंद्रावर पाळले जात नाहीत.
मालेगाव तालुक्यात वाढणाऱ्या कोरोणा बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना मात्र सेतू केंद्रावर नियोजनाचा अभाव आहे. यातच प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची व सेतू कार्यालयात येणाऱ्यां प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी प्रशासनाने घ्यावी. आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे.