कवडदरा येथे लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:18 AM2021-09-05T04:18:28+5:302021-09-05T04:18:28+5:30
प्रत्येकाला लस मिळणे शक्य नव्हते कारण लसीचे फक्त दोनशे डोस आलेले होते, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संदीप वेढे ...
प्रत्येकाला लस मिळणे शक्य नव्हते कारण लसीचे फक्त दोनशे डोस आलेले होते, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संदीप वेढे यांनी दिली. यामुळे लसीची कमतरता होती. यावेळी सरपंच अश्विनी भोईर, भूषण डामसे, शाम निसरड, संपत रोंगटे यांनी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना शांततेचे आवाहन केले. परंतु, लस घेण्यास आलेले नागरिक ऐकण्यास तयार नव्हते. डॉ. मुरली ठाकूर यांनी नागरिकांना वैयक्तिक सूचना दिल्यानंतर लसीकरण सुरळीत चालू झाले.
लसीकरणासाठी आरोग्य अधिकारी डॉ. संदीप वेढे, डॉ. खोब्रागडे, डॉ. आखाडे, डॉ. सूर्यवंशी, राजू जागवल, डॉ. वालझडे, डॉ. मोंढे, डॉ. सौ. नवले, डॉ. सौ. गिरी, डॉ. सौ. कुलकर्णी, तसेच आरोग्यसेविका, आशा सेविका यांनी लसीकरण कॅम्पमध्ये व्यवस्थित काम पाहिले. तसेच सरपंच अश्विनी भोईर, भूषण डामसे, शाम निसरड, संपत रोंगटे, भाऊराव रोंगटे, रमेश निसरड यांचे सहकार्य मिळाले.
चौकट...
लसींची कमतरता...
लसीकरण कॅम्पमध्ये लसीचे डोस संख्या वाढवून मिळणे आवश्यक आहे. कारण दोनशे डोस कमी पडतात. अजूनही खूप नागरिकांना लस मिळालेली नाही, अशी मागणी आरोग्य विभागास सामाजिक कार्यकर्ते भूषण डामसे, शाम निसरड यांनी केली आहे.