खडकी सुळेश्वर यात्रोत्सवात भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:45 PM2020-02-23T23:45:18+5:302020-02-24T00:48:56+5:30
सुळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रोत्सवात हजारो भाविकांनी हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
खडकी : येथील सुळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रोत्सवात हजारो भाविकांनी हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी मंदिर समितीने व्यवस्था केली होती. यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात श्रीफळ, हार-फुले, प्रसाद तसेच खेळणी, फराळांची दुकाने थाटली होती. चिमुकल्यांनी यात्रोत्सवाचा आनंद लुटला. विविध खाद्यपदार्थ्यांच्या दुकानांनी परिसर गजबजलेला होता.
महाशिवरात्रीला महादेवाला श्रीफळ अर्पण केले जाते. त्यामुळे दुकानावर गर्दी झाली होती. भाविकांनी दर्शनासह मनोरंजनाचा आस्वाद घेतला. सुळेश्वर मंदिर माळमाथा परिसरातील प्रसिद्ध देवस्थान आहे. गाळणे येथील भाविक सुळेश्वर मंदिर येथे आवर्जून हजेरी लावतात. गावात एकलव्य जयंतीनिमित्त एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दिनेश गायकवाड, अशोक माळी, राजू ठाकरे, बजरंग, दिलीप सोनवणे, ईश्वर सोनवणे आदींसह नागरिक उपस्थित होते.