अंगारिकीनिमित्त गणेश मंदिरात भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:13 AM2018-04-04T00:13:56+5:302018-04-04T00:13:56+5:30
निफाड : वर्षाच्या पहिल्या अंगारिकेच्या योगावर निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील येथील वरदविनायक मंदिरात गणेश भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती ,
निफाड : वर्षाच्या पहिल्या अंगारिकेच्या योगावर निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील येथील वरदविनायक मंदिरात गणेश भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती , नांदुर्डी येथील वरदविनायक मंदिरातील सेंदूरमय मूर्तीला पहाटे अभिषेक करण्यात आला ,अंगरिकेनिमित्ताने भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वरदविनायक मंदिर ट्रस्टने मंदिराच्या परिसरात मांडव टाकून सावली केली होती,पाण्याची व्यवस्थाही केली होती ,परिसरातील निफाड, निफाड कारखाना,दावचवाडी ,पिंपळगाव बसवंत , रवळस पिंप्री , उगाव ,शिवडी यासह दूरवरच्या गावातील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिर ,परिसरात प्रसादाची व इतर अनेक दुकाने थाटलेली होती , मंदिराचे पुजारी जगदीश कुलकर्णी यांनी धार्मिक पूजा विधी केले मंदिर ट्रष्टचे अध्यक्ष सुरेशबाबा पाटील व विश्वस्तांनी भाविकांच्या दर्शनाची उत्तम व्यवस्था केलेली होती रात्री उशिरा पर्यंत भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती लोहोणेर : ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात श्रीच्या दर्शना साठी भाविकांनी भल्या पहाटे पासून मोठी गर्दी केली होती. अंगरिका चतृर्थी निमित्ताने पहाटे चार वाजता भविका करीता दर्शनासाठी खुले करण्यात आले होते . यावेळी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्यावतीने फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात पेढे, फुले, खेळणी व फराळाचे दुकाने लावण्यात आल्याने मंदिराला यात्रेचे स्वरूप आले होते तर मिदरा लगत रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी झाल्याने वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत होता यावेळी श्रीच्या दर्शनासाठी आबालवृद्धासह महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत श्रीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.