कुशावर्तावर भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:45 AM2017-08-15T00:45:39+5:302017-08-15T00:46:16+5:30
त्र्यंबकेश्वर : श्रावणातील चौथ्या सोमवारी भाविकांनी प्रदक्षिणेचा आनंद लुटला. श्रावणातील रिमझिम पाऊस, गार वारे अशा सुखद वातावरणात ब्रह्मगिरी परिक्रमेचा सुखद अनुभव भाविकांनी घेतला. रविवार रात्रीपासूनच भाविकांचा ‘बम बम भोले’चा जयघोष सरू होता.
त्र्यंबकेश्वर : श्रावणातील चौथ्या सोमवारी भाविकांनी प्रदक्षिणेचा आनंद लुटला. श्रावणातील रिमझिम पाऊस, गार वारे अशा सुखद वातावरणात ब्रह्मगिरी परिक्रमेचा सुखद अनुभव भाविकांनी घेतला. रविवार रात्रीपासूनच भाविकांचा ‘बम बम भोले’चा जयघोष सरू होता. प्रदक्षिणा रस्त्यावर कपालेश्वर भक्त परिवार, पंचवटी नाशिक भक्त मंडळातर्फे भाविकांना साबुदाणा खिचडी, राताळी व चहा असे फराळाचे वाटप सुरू होते. त्र्यंबकेश्वर मंदिरात तशी गर्दी दररोजच असते. पण चौथ्या सोमवारचे औचित्य साधून आज भाविकांच्या संख्येत वाढ झाली होती. कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी प्रचंड गर्दी झाली होती. मागील सोमवारी भाविकांना ग्रहण सुटल्यानंतर रात्री उशिरा स्नान करावे लागले होते. तोपर्यंत दिवस बदलला होता. त्यामुळेच स्नानासाठी गर्दी झाली होती. याशिवाय आज जन्माष्टमीदेखील असल्याने भाविकांनी कुशावर्तावर व मंदिरात गर्दी केली होती. त्र्यंबकेश्वर पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने स्वच्छतेची अंमलबजावणी केली. नगराध्यक्ष तृप्ती धारणे, मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे आदींनी परिस्थितीची पाहणी केली. त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक दुपारी पावणेतीन वाजता भगवान त्र्यंबकराजाची सोमवार पालखी मिरवणूक कुशावर्तावर स्नानासाठी नेण्यात आली. पालखी मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. यावेळी स्नानपूजा, आरती, मंत्र-पुष्पांजली होऊन पालखी पुनश्च मंदिरात आणण्यात आली.