नस्तनपूरला भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:45 AM2018-09-02T00:45:22+5:302018-09-02T00:46:13+5:30

नांदगाव : दुष्काळाचा तालुका असूनदेखील हिरवाईने बहरलेले तीर्थस्थळ म्हणून श्रीक्षेत्र नस्तनपूर मंदिर व परिसराचा झालेला कायापालट थक्क करणारा असल्याचे प्रतिपादन शिर्डी देवस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी व मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे सहायक निबंधक बाजीराव शिंदे यांनी केले. शिंदे यांच्यासह येवल्याचे प्रांताधिकारी भीमराज दराडे, नेते महेंद्र बोरसे, विजय पाटील यांनी शनिवारी नस्तनपूर येथील तीर्थस्थळी भेट दिली. त्यांच्या हस्ते श्रावण शनिवारची माध्यान्य आरती संपन्न झाली .

The crowd of devotees at Nastanpur | नस्तनपूरला भाविकांची गर्दी

नस्तनपूरला भाविकांची गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्दे महापूजा करण्यासाठी भाविकांची गर्दी

नांदगाव : दुष्काळाचा तालुका असूनदेखील हिरवाईने बहरलेले तीर्थस्थळ म्हणून श्रीक्षेत्र नस्तनपूर मंदिर व परिसराचा झालेला कायापालट थक्क करणारा असल्याचे प्रतिपादन शिर्डी देवस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी व मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे सहायक निबंधक बाजीराव शिंदे यांनी केले.
शिंदे यांच्यासह येवल्याचे प्रांताधिकारी भीमराज दराडे, नेते महेंद्र बोरसे, विजय पाटील यांनी शनिवारी नस्तनपूर येथील तीर्थस्थळी भेट दिली. त्यांच्या हस्ते श्रावण शनिवारची माध्यान्य आरती संपन्न झाली . त्यांनतर देवस्थानच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. देवस्थानचे प्रमुख विश्वस्थ माजी आमदार अँड अनिल आहेर, विजय चोपडा, उदय पवार , खासेराव सुर्वे, समाधान पाटील, डॉक्टर प्रभाकर पवार, डॉक्टर प्रवीण निकम , भास्कर शेवाळे , शिवाजी बच्छाव, हरेश्वर सुर्वे, संदीप मवाळ, नवनाथ बोरसे, महेश आहेर आदी उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान तिसऱ्या श्रावणी शनिवारी लाखो भाविकांनी दर्शन घेतले. शनिच्या प्राचीन मूर्तीवर तेलाभिषेक व महापूजा करण्यासाठी भाविकांची गर्दी होती. संस्थानतर्फे भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

Web Title: The crowd of devotees at Nastanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक