कळसूबाई शिखरावर भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 03:00 PM2019-10-04T15:00:53+5:302019-10-04T15:01:05+5:30

घोटी : महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाऱ्या कळसूबाई शिखरावर नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी होत आहे.

 The crowd of devotees at the peak of Kalsubai | कळसूबाई शिखरावर भाविकांची गर्दी

कळसूबाई शिखरावर भाविकांची गर्दी

googlenewsNext

घोटी : महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाऱ्या कळसूबाई शिखरावर नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी होत आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये देवीचे मंदिर आहे. पायथ्याला एक मंदिर व उंच शिखरावर मंदिर आहे. घटस्थापना ते दसरा या कालावधीत भाविक मोठ्या श्रद्धेने शिखर सर करतात. वर्षभर पर्यटक तसेच देवीभक्त येत असतात. नवरात्रोत्सवात नाशिक, अहमदनगर, तसेच मुंबईहून भाविक येत असतात. घोटी येथील कळसूबाई मित्र मंडळ हे गेल्या २३ वर्षांपासून नवरात्रीचे नऊही दिवस शिखर सर करून पहाटेच्या यात्रेचा मान मिळवतात. तसेच मंदिर परिसराची साफसफाई करत असतात. मित्र मंडळाचे भागिरथ मराडे व सहकारी यांच्या पावलावर पाऊल ठेऊन घोटी, इगतपुरी,पिंपळगाव मोर, उभाडे येथील तरु ण देखील नव्या उत्साहाने आणि जोमाने नऊ दिवस शिखरावर जात असतात. शिखर चढताना लोखंडी शिड्या आणि खडक यांच्या आधारे टोक गाठतात. पहाटे तीन वाजेपासून तरु ण आणि भाविक पायथ्यापासून सुरु वात करतात. पाचव्या, सातव्या, नवव्या माळेला गर्दी उसळते.

Web Title:  The crowd of devotees at the peak of Kalsubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक