दिंडोरी बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:48 IST2021-05-11T22:37:26+5:302021-05-12T00:48:25+5:30
दिंडोरी : जिल्ह्यात बुधवारपासून कडक निर्बंधांच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सकाळी येथील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. यात विशेषतः किराणा दुकान व पेट्रोलपंपावर नागरिकांनी गर्दी केली होती.

दिंडोरी बाजारपेठेत गर्दी
दिंडोरी : जिल्ह्यात बुधवारपासून कडक निर्बंधांच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सकाळी येथील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. यात विशेषतः किराणा दुकान व पेट्रोलपंपावर नागरिकांनी गर्दी केली होती.
तालुक्यात यापूर्वी कडक निर्बंध असून सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ११ पर्यंत किराणा दुकाने, कृषीपूरक व्यवसाय सुरू होते. मेडिकल, हॉस्पिटल, बँक वगळता इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. बुधवारपासून १२ दिवस किराणा दुकाने बंद राहणार असून पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यावर निर्बंध येणार असल्याचे समजताच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. किराणा खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली तर पेट्रोलपंपावर इंधनासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहराबाहेर भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडेही ग्राहकांची गर्दी वाढली होती.