प्रधानमंत्री सन्मान पेन्शन योजनेचे अर्ज भरण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:59 AM2019-06-21T00:59:46+5:302019-06-21T01:00:11+5:30

केंद्र सरकारने दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांनाही सहा हजार रुपये प्रधानमंत्री सन्मान पेन्शन योजनेत समाविष्ट केल्याने पिंपळगाव लेप सजेत शेतकºयांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली.

The crowd to fill the application for the Prime Minister Honor Pension Scheme | प्रधानमंत्री सन्मान पेन्शन योजनेचे अर्ज भरण्यासाठी गर्दी

पिंपळगाव लेप सजेत शेतकऱ्यांनी सन्मान पेन्शन योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी.

Next

जळगाव नेऊर : केंद्र सरकारने दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांनाही सहा हजार रुपये प्रधानमंत्री सन्मान पेन्शन योजनेत समाविष्ट केल्याने पिंपळगाव लेप सजेत शेतकºयांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली. गुरुवारी येथील तलाठी कार्यालयात कृषी सहायक साईनाथ कालेकर, तलाठी कमलेश पाटील व विनोद आहिरे यांनी शेतकºयांकडून अर्ज, आधारकार्ड झेरॉक्स, बॅँक पासबुक जमा केले. सुरुवातीला अल्पभूधारक व पाच एकरच्या आतील शेतकºयांना सहा हजार रु पये पेन्शन अनुदान देऊन अनेक शेतकºयांच्या खात्यावर एक हप्ता दोन हजार रु पये वर्ग झाला, पण मध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने अनेक शेतकरी वंचित राहिले, पण आचारसंहिता संपून तीन आठवड्यांचा कालावधी उलटूनही अनुदान वर्ग झालेले नसल्याने शेतकºयांना बी-बियाणे, शेती मशागतीला भांडवलाची चणचण भासत आहे, तेव्हा शासनाने त्वरित पेन्शन अनुदान वर्ग करावे जेणेकरून शेतकºयांना शेती भांडवलासाठी उपयोगी पडेल, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Web Title: The crowd to fill the application for the Prime Minister Honor Pension Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.