मुल्हेर येथील बॅँकेसमोर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:22 PM2020-04-16T20:22:58+5:302020-04-17T00:31:20+5:30
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील महाराष्ट्र बँकेच्या बाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी ऐन ‘लॉकडाउन’मध्ये केलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे उल्लंघन होत आहे.
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील महाराष्ट्र बँकेच्या बाहेर पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी ऐन ‘लॉकडाउन’मध्ये केलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे उल्लंघन होत आहे. त्यामुळे येथे कडक उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मुल्हेर येथे बँक आॅफ महाराष्ट्रची एकमेव शाखा आहे. पश्चिम आदिवासी भागातील मुल्हेर प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे. या भागातील सर्व आर्थिक व्यवहार मुल्हेरशी जोडले गेल्याने परिसरातील सर्व गावकऱ्यांचे आर्थिक व्यवहार मुल्हेरशी जोडले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे पश्चिम आदिवासी पट्ट्यातील सर्व आर्थिक व्यवहार थांबले आहेत. बहुतांश आदिवासी बांधव शेती, मोल मजुरी करतात, पण कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेली संचारबंदी पुन्हा ३ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थांना स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी करून एकच रांग लावली आहे. गर्दीचे प्रमाण वाढत आहे.