कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:02 AM2018-11-24T01:02:57+5:302018-11-24T01:03:15+5:30
कार्तिक पौर्णिमेनिमित्त मुक्तिधाम व विहितगाव येथील श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम्मध्ये श्ुाक्रवारी श्री कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी व मोराचे पीस वाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
नाशिकरोड : कार्तिक पौर्णिमेनिमित्त मुक्तिधाम व विहितगाव येथील श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम्मध्ये श्ुाक्रवारी श्री कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी व मोराचे पीस वाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
मुक्तिधाम व नवग्रह सिद्धपीठम्मध्ये गुरुवारी रात्री शेकडो दीपप्रज्वलित करण्यात आले होते. बहुतांश भाविक सूर्योदयापासून लागलेली कार्तिक पौर्णिमा मानत असल्याने शुक्रवारी सकाळपासून भाविकांनी दर्शन व मोरपीस वाहण्यासाठी गर्दी केली होती. दोन्ही मंदिरात सकाळी विधीवत पूजा करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी दोन्ही मंदिरात गर्दी केल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.