ढग्या डोंगरावर खंडोबा महाराज दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:59 AM2019-02-20T00:59:46+5:302019-02-20T01:00:13+5:30
नायगाव : सिन्नर शहराजवळील ढग्या डोंगरावर असलेल्या खंडोबा महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी केली होती. भंडार-खोबऱ्याची उधळण करत नववधू-वरांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाºया ढग्या डोंगरावरील खंडोबा महाराजांचे मंगळवारी लाखो भाविकांनी हजारो फूट उंचाची चढाई करत दर्शन घेतले.
नायगाव : सिन्नर शहराजवळील ढग्या डोंगरावर असलेल्या खंडोबा महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी केली होती. भंडार-खोबऱ्याची उधळण करत नववधू-वरांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाºया ढग्या डोंगरावरील खंडोबा महाराजांचे मंगळवारी लाखो भाविकांनी हजारो फूट उंचाची चढाई करत दर्शन घेतले. जिल्हाभरातील हजारो भाविकांनी पहाटेपासून डोंगरावर गर्दी केली होती.
ढग्या डोंगराच्या कड्याकपाºया येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय, सदानंदाचा येळकोट आदी घोषणांनी दणाणून गेला होता. अनेक भाविकांनी आपल्या घरातील देव्हाºयातील देवाचे टाक भेटीसाठी आणले होते. भाविकांनी नैवेद्य व तळी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. वाघ्या-मुरळीने खंजरी, झांजरी व तुणतुणे आदी वाद्यांच्या गजरात भाविकांच्या देवभेटीबरोबर अनेक गावातून खंडोबा महाराजांच्या भेटीसाठी आलेल्या काठ्यांचा कार्यक्रम पार पाडला. उंच असलेल्या ढग्या डोंगरावर चढणे कठीण आहे. अशातच उन्हाची तीव्रता झेलत भाविक हा डोंगर चढत दर्शन घेत असतात. अशावेळी येणाºया भाविकांना विविध अडचणीबरोबर पाण्याची अडचण येते. ही अडचण लक्षात घेऊन देशवंडी येथील सचिन कांगणे यांनी जे. एम. ग्रुपच्या सदस्यांसह यावर्षीही डोंगराच्या विविध टप्प्यांवर शुद्ध पाण्याची व्यवस्था केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.