लससाठी उच्चभ्रूंची गर्दी; झोपडपट्टीवासीय वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:19 AM2021-09-07T04:19:09+5:302021-09-07T04:19:09+5:30
लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच उच्चभ्रू व मध्यमवर्गीय नागरिक रांगेत उभे राहत असून, गावठाण तसेच झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची कामधंदा व मोलमजुरीची ...
लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच उच्चभ्रू व मध्यमवर्गीय नागरिक रांगेत उभे राहत असून, गावठाण तसेच झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची कामधंदा व मोलमजुरीची वेळ असल्याने साहजिकच त्यांचा पोटापाण्याकडे ओढा अधिक आहे. त्यामुळे तासनतास रांगेत उभे राहून दिवसाची रोजीरोटी वाया जाण्याच्या भीतीने ते लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. काेरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांचेच लसीकरण गरजेचे असले तरी, महापालिकेने प्रामुख्याने अशा भागांवर लक्ष केंद्रित करून लसीकरणाचा वेग कसा वाढेल याचा विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.
इन्फो----
उच्चभ्रू तसेच मध्यमवर्गीय नागरिकांचे लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामानाने झोपडपट्टी भागातील रहिवासी अद्याप लसीकरणासाठी पुढे आलेले नाहीत. त्यांनीदेखील लस लवकरात लवकर घेणे गरजेचे असून, त्यासाठी लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
-डॉ. विजय देवकर, वैद्यकीय अधीक्षक, मनपा