कळसूबाईच्या दर्शनाला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:03 AM2017-09-28T00:03:58+5:302017-09-28T00:11:52+5:30

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळसूबाई मातेच्या दर्शनासाठी बुधवारी कळसूबाई शिखरावर भक्तांनी अलोट गर्दी केली होती. राज्यातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाºया कळसूबाई शिखरावरील कळसूबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी भक्त नवरात्रोत्सव काळात गिर्यारोहणाची अनुभूती घेतात.

Crowd of Kalsubai | कळसूबाईच्या दर्शनाला गर्दी

कळसूबाईच्या दर्शनाला गर्दी

googlenewsNext

घोटी : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळसूबाई मातेच्या दर्शनासाठी बुधवारी कळसूबाई शिखरावर भक्तांनी अलोट गर्दी केली होती. राज्यातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाºया कळसूबाई शिखरावरील कळसूबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी भक्त नवरात्रोत्सव काळात गिर्यारोहणाची अनुभूती घेतात.  राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाई शिखरावर कळसूबाई मातेचे मंदिर आहे. नवरात्र काळात नाशिक जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील अनेक भाविक शिखरावर दर्शनाला गर्दी करतात. नवरात्रीत तिसºया, पाचव्या आणि सातव्या माळेला भाविकांची अलोट गर्दी उसळते. पहाटे ४ वाजेपासून भाविक हे शिखर चढण्यास सुरु वात करतात.  अवघड ठिकाणी लोखंडी शिड्या व साखळीचा आधार घेत भाविक मंदिराजवळ पोहचतात. दरम्यान, बुधवारी सातव्या माळीला मध्यरात्रीपासूनच भाविकांची रीघ लागली होती. यामुळे अरुंद शिड्यांवर भाविक अनेक तास अडकून पडल्याने गैरसोय झाली होती. देवीदर्शनाला राज्यभरासह विशेषत: मुंबईहून येणाºया भाविकांची संख्या मोठी आहे.
देवगाव परिसराला यात्रेचे स्वरूप
देवगाव : नवसाला पवणारी देवी म्हणून देवगाव येथील देवी जगदंबा भवानीची महती आहे. या मातेची अंबाबाई म्हणूनही प्रसिद्धी आहे. नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. भाविक नतमस्तक होऊन नवस करतात. तर काही नवस पूर्ण झाला म्हणून मनोभावे पूजा, होम-हवन करतात. नवरात्रोत्सवात रात्रंदिवस भाविकांची गर्दी होत असल्याने देवगाव परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे. देवगाव जेव्हा नावारुपाला येऊ लागले तेव्हा माहूर येथील कुशाबा बोचरे गृहस्थ येथे वास्तव्यास होते.
नवसाला पावणारी देवी म्हणून देवगावच्या जगदंबेची महती आहे. नवरात्रोत्सवात येथे पुरुष व महिला घटी बसतात. ही परंपरा कै. खंडेराव पुंजाजी मेमाणे व कै. शंकर विष्णू कुलकर्णी यांनी सुरू केली. मंदिराचा जिर्णोद्धार झाल्यानंतर घटी बसणाºयाच्या संख्येत वाढ होत आहे. दत्तात्रय बोचरे, खंडू बोचरे, संपत बोचरे, विलास शिंदे, रामनाथ बोचरे, नामदेव बोचरे, गोपीनाथ मेमाणे, प्रशांत कुलकर्णी दत्तू बोचरे, ज्ञानेश्वर मेमाणे, रामनाथ घाडगे, हे पुरु ष तर जनाबाई बोचरे, रंगूबाई तळेकर या महिला घटी बसल्या आहेत.

Web Title: Crowd of Kalsubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.