स्थानिक भाविकांची गर्दी
By admin | Published: February 11, 2017 11:57 PM2017-02-11T23:57:49+5:302017-02-11T23:58:10+5:30
वडांगळी : शनिवार वर्ज्य असल्याने एकही बोकडबळी नाही
वडांगळी : अखिल भारतीय बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सुमारे ५० हजारांहून अधिक भाविकांनी सतीमाता व सामतदादा चरणी लीन होत दर्शन घेतले. शनिवार वर्ज्य असल्याने नवसपूर्तीसाठी एकही बोकडबळी देण्यात आला नव्हता. वडांगळी पंचक्रोशीतील भाविकांनी लोटांगण घालून, नारळ वाढवून व सत्यनारायण पूजन करून नवसपूर्ती केली. शनिवार हा नवसपूर्तीसाठी बोकडबळी देण्यास निषिद्ध मानला जात असल्याचे काही भाविकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शनिवारी यात्रेत बंजारा भाविकांची गर्दी झालीच नाही. याशिवाय शुक्रवारी देशभरातून यात्रेत दाखल झालेले बंजारा भाविक लागलीच परत गेले आहेत. भाविकांची गर्दी कमी झाल्याने बंदोबस्तही कमी करण्यात आला होता. रविवार हा सुटीचा वार असल्याने बोकडबळी देऊन नवसपूर्ती करण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)