पांडवांनी साकारलेल्या महादेव मंदिरात गर्दी

By admin | Published: August 21, 2016 10:25 PM2016-08-21T22:25:11+5:302016-08-21T22:26:53+5:30

पांडवांनी साकारलेल्या महादेव मंदिरात गर्दी

The crowd in the Mahadev Temple built by the Pandavas | पांडवांनी साकारलेल्या महादेव मंदिरात गर्दी

पांडवांनी साकारलेल्या महादेव मंदिरात गर्दी

Next

 पिंपळगाव घाडगा : इगतपुरी तालुक्यात भाविकांचे श्रद्धास्थानबेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील प्राचीन महादेव मंदिर हे जागृत देवस्थान असून, अनेक भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. श्रावण सोमवारी येथे लांबवरून अनेक शिवभक्त दर्शनाचा लाभ घेतात.
घोटी-शिर्डी या राज्य महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर हे शिवमंदिर सर्वांचेच लक्ष वेधून घेते. या मंदिरात प्राचीन शिविलंग, तर शेजारी हनुमान मंदिर देखील आहे. प्रवेशद्वाराजवळ दगडी नंदीची मूर्ती जणू काही भक्तांना प्रेरणा देणारी आहे. या गावातील अनेक आबालवृद्ध आजही येथील पांडवकालीन मंदिराची परंपरा टिकवून ठेवताना दिसतात.
येथील शिव मंदिराची स्थापना पांडवांनी केली असल्याचे गावातून सांगण्यात येते. मंदिराच्या आजूबाजूला पांडवांनी मोठ्या कुशलतेने कोरीव कामातून शिवगण, बुद्धमूर्ती, प्रवेशद्वाराजवळ गणेशमूर्ती व इतर नक्षीकामातून दगडी मंदिर साकारलेले दिसते. नाशिक येथील प्रसिद्ध पांडवलेणीप्रमाणे येथेही तसेच नक्षीकाम केलेले आहे. पिंपळगाव घाडगा येथील पांडवांनी साकारलेले शिवमंदिर त्यांच्या सुंदर कुशलतेचे प्रतीक आहे. शासनाने या शिवमंदिरासाठी सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी येथील पुजारी प्रभाकर महाराज यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
या जागृत शिवमंदिरात महान तपस्वी सरजुदास महाराज यांनी घोर तपश्चर्या करीत हे मंदिर पावन केले आहे. दरम्यान, येथून सर्वतीर्थ टाकेद हाकेच्या अंतरावर असल्यामुळे सर्वतीर्थाकडे जाणारे भाविक आवर्जून या जागृत महादेव मंदिराचे दर्शन घेऊनच पुढे मार्गक्र मण करतात. या मंदिरात श्रावण महिन्यात हरिनाम सप्ताहाचे आयोजनदेखील करण्यात येते. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत लपलेल्या या शिवमंदिरात शिर्डीकडे पायी जाणाऱ्या साईभक्तांचे निवासस्थान बनले आहे. पावसाळ्यात त्यांना मंदिराचा मोठा आधार मिळतो.

Web Title: The crowd in the Mahadev Temple built by the Pandavas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.