त्र्यंबकेश्वरी गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 12:58 AM2022-02-24T00:58:38+5:302022-02-24T00:59:04+5:30
श्रीगजानन महाराज प्रगट दिनानिमित्त येथील गजानन महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी संस्थानच्या वतीने विविध धार्मिक विधी संपन्न झाले.
त्र्यंबकेश्वर : श्रीगजानन महाराज प्रगट दिनानिमित्त येथील गजानन महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी संस्थानच्या वतीने विविध धार्मिक विधी संपन्न झाले.
गत वर्षापासून श्रीगजानन महाराज संस्थान मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘श्रीं’चा प्रगट दिन साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. बुधवारी (दि. २३) महाराजांच्या प्रगटदिनी दुपारी १२ वाजता महाराजांची षोडशोपचारे पूजाअर्चा करण्यात आली. दरवर्षी भोजनाचा आस्वाद प्रत्येकाला मिळतो. पण यावर्षी फक्त लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाला लाडू प्रसादाचे वितरण करण्यात आले. यंदाही खबरदारी म्हणून साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गावातील मान्यवर भाविकांसह तहसीलदार दीपक गिरासे यांनी दर्शनास उपस्थिती लावली. रात्री उशिरापर्यंत दर्शनार्थींची गर्दी होती. दिवसभरात सुमारे १५ हजारांहून भाविकांनी दर्शन घेतल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.