कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 05:09 PM2019-01-02T17:09:14+5:302019-01-02T17:13:33+5:30
पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व खाजगी बाजार समिती मध्ये दि. १ नोव्हेंबर ते १५ डिसेबर २०१८ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान जाहिर केल्याने आता शेतकºयांनी कांदा पावती, आधार कार्ड, पास बुक, उतारे घेऊन बाजार समितीमध्ये कागदपत्राची पुर्तता करून ते बाजार समिती कार्यलयात जमा करण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या चार दिवसात सुमारे साडे तीन हजार शेतकºयांनी या अनुदानासाठी अर्ज केला असुन नासिक जिल्ह्यातील शेतकरी तसेच जिल्हा बाहेरील शेतकरी बांधवांनी बाजार समिती कांदा अनुदानासाठी गर्दी केली आहे. (फोटो ०२ पिंपळगाव१)