मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी, खासगी वाहतुकदारांकडून दुप्पट भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:41 PM2018-09-14T13:41:13+5:302018-09-14T15:20:02+5:30

मनमाड: कसारा रेल्वे स्थानका दरम्यान ओव्हरहेड वायर दुरु स्त करणाऱ्या व्हॅनला मालगाडी ने धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे.

A crowd of passengers at the Manmad railway station, double fares from private transporters | मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी, खासगी वाहतुकदारांकडून दुप्पट भाडे

मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी, खासगी वाहतुकदारांकडून दुप्पट भाडे

googlenewsNext

मनमाड: कसारा रेल्वे स्थानका दरम्यान ओव्हरहेड वायर दुरु स्त करणाऱ्या व्हॅनला मालगाडी ने धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे. यामुळे दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहे तर अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याने मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. मनमाड रेल्वे स्थानकावरून सुटणाºया मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस व मनमाड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने दैनंदिन कामकाजासाठी जा ये करणाºया चाकर मान्यांची गैरसोय झाली. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे तर काही गाड्या मनमाड व नाशिक रेल्वे स्थानकावरून माघारी फिरवण्यात आल्या. ऐन गणेशोत्सव काळात प्रवाशांची गौरसोय झाली आहे.अनेक गाड्या विलंबाने धावत असल्याने रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले आहे.उत्तर भारतात जाणा-या अनेक गाड्या मनमाड स्थानका वरून परत पाठवण्यात आल्याने स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. मनमाड येथून नाशिक व मुंबईकडे जाण्यासाठी काही प्रवाशांनी खाजगी वाहनाने जाण्याचा पर्याय निवडला.प्रवाशाची गर्दी अधिक वाढल्याने जादा दराने भाडे देण्याची वेळ प्रवाशांवर आली. रेल्वे स्थानकावर वाढलेल्या गर्दीमुळे रेल्वे स्थानक व परिसरात खाद्य पदार्थ व पाण्याच्या दरात काही विक्र ेत्यांनी अव्वाच्या सव्वा वाढ केल्याच्या तक्र ारी प्रवाशांनी केल्या.
गाड्यांचे बदलेले नियोजन...
रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने अनेक गाड्यांचे नियोजन बदलण्यात आले आहे. यामध्ये मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकावरून परत येणार आहे. मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस कल्याण वरून पुणे दौंड मार्गे मनमाड कडे वळवण्यात आली आहे. मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस निर्धारित वेळेत नाशिक स्थानकावरून सुटणार आहे. जनशताब्दी एक्सप्रेस मनमाड येथून निर्धारित वेळेत सुटणार आहे.गोदान एक्सप्रेस कल्याण पुणे दौंड मनमाड मार्गे रवाना होणार आहे. गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेस निर्धारित वेळे ऐवजी १ वाजता सुटेल.पवन एक्सप्रेस निर्धारित वेळेऐवजी २ वाजता सुटेल. कामायनी एक्सप्रेस निर्धारित वेळे ऐवजी २.३० ला सुटेल.मुंबई भुसावळ पॅसेंजर आज रद्द करण्यात आली आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गोदावरी एक्सप्रेस रद्द ....बाप्पांची आरती मात्र अखंडित...
मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस आज रेल्वे प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी गोदावरी एक्सप्रेस मध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणरायाची आरती मात्र अखंडित पणे निर्विघ्न पार पडली. सकाळी फलाटावर लावलेल्या गोदावरी एक्सप्रेसमध्ये भाविक प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलचे निरीक्षक के. डी. मोरे यांच्या हस्ते गणरायाची आरती केली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र खैरे, मुकेश निकाळे, संदीप व्यवहारे, धनंजय आव्हाड, संदीप आढाव , मंगेश जगताप, स्वप्नील म्हस्के , सुरज चैधारी,विशाल अहिरे भूषण पवार आदी उपस्थित होते. सायंकाळची आरती पण मनमाड रेल्वे स्थानकावर करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.

Web Title: A crowd of passengers at the Manmad railway station, double fares from private transporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक