अंदरसुल बी बियाणे खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 04:00 PM2019-06-25T16:00:05+5:302019-06-25T16:00:11+5:30
अंदरसुल : अंदरसुल व पूर्वभागातील खेड्यावर मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतक्नº्यांनी बी बियाणे खरेदीसाठी बी बियाणांच्या दुकानात गर्दी केली आहे.
अंदरसुल :
अंदरसुल व पूर्वभागातील खेड्यावर मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतक्नº्यांनी बी बियाणे खरेदीसाठी बी बियाणांच्या दुकानात गर्दी केली आहे. त्या व्यतिरिक्त इतर शेतकरी देखील खरेदीसाठी येतात काल व आज बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून काही खेड्यावर थोड्या पावसावर देखील दोन दिवसांपूर्वी लागवड केली. या नंतर आलेल्या पावसानेकाही शेतकº्यांनी पेरलेले उतरून पडले तर काहींचे बियाणे निकामी झाले मात्र सलग दोन दिवस मान्सून चांगला बरसला व शेतीकामाला वेग आला. अंदरसुल गावाच्या चारही दिशेला पावसाने दमदार मुसंडी मारली अंदरसुल, गवंडगाव, बोकटे ,देवळान,े दुगलगाव, उंदिरवाडी, पांजरवाडी, अंगुलगाव, गारखेडे ,तळवाडे, न्यारखेडे, भुलेगाव, देवठाण, खामगाव, पिंपळखुटे, सुरेगावरस्ता, व सायगाव धामणगाव येथे बº्याच शेतकऱ्यांनी मका सोयाबीन कापूस व तुरळकच बाजरी लागवड केली आहे. अद्याप पेरण्या चालू आहेत मात्र अद्याप कोणत्याही खेड्यावर व अंदरसुल परिसरात वाड्या वस्त्यावर मुसळधार पाऊस न झाल्याने ओढे नाले व नदी ला पाणी नसल्याने विहिरींना पाणी उतरले नाही व जनावरांना पिण्यासाठी पाणी व चारा टंचाई जैसेथेच आहे आलेल्या पावसाच्या रामभरोसे पेरणी सुरू झाल्या आहेत पावसाळी वातावरण टिकून असल्याने बळीराजा आशावादी झाला आहे