रेणुकादेवीच्या दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:47 PM2017-09-21T23:47:13+5:302017-09-22T00:17:54+5:30
कुलस्वामिनी रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व रिंकू कासलीवाल यांच्या हस्ते घटस्थापना झाली. चांदवडचे न्यायमूर्ती के.जी. चौधरी, न्यायमूर्ती एस.एम. धपाटे, न्यायमूर्ती श्रीमती कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती झाल्याची माहिती एम.के. पवार, सहा. व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली.
चांदवड : कुलस्वामिनी रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व रिंकू कासलीवाल यांच्या हस्ते घटस्थापना झाली. चांदवडचे न्यायमूर्ती के.जी. चौधरी, न्यायमूर्ती एस.एम. धपाटे, न्यायमूर्ती श्रीमती कुलकर्णी यांच्या हस्ते महाआरती झाल्याची माहिती एम.के. पवार, सहा. व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली.
यावेळी दिवसभरात भाविकांची पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी होती. मंदिरात होमहवन, तर दररोज पहाटे ५ वाजता महाभिषेक, पालखी मिरवणूक, रात्री महाआरती आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांना देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी स्टीलचे बॅरिकेटिंग (दर्शन रांग) तसेच पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. देवीच्या गाभाºयात जाणारा पूर्वीचा दरवाजा लहान असल्याने दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असे. तो मोठा करण्यात आला
आहे. तसेच बाहेरूनच देवीचे दर्शनही होऊ शकते. त्यामुळे भाविक मुख दर्शनही घेऊ शकतात. येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र जिना करण्यात आला आहे. यात्रोत्सव काळात विविध प्रकारची दुकानेही थाटण्यात आल्याने परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे, तर नव्याने संपूर्ण मंदिर परिसरात घडीव दगडाचे अस्तर करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभाºयासह पुरातत्त्व विभागाचे वतीने सहाय्यक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या पुरातन अशा दोन दीपमाळ पूर्णपणे बदलवून तशाच्या तशा नव्याने दगडात कोरून तयार केल्या आहेत.