सातपूर गावासमोरील रस्त्यावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:52+5:302021-01-14T04:12:52+5:30
त्र्यंबकेश्वर पर्यटनस्थळांवर तरुणांचा उपद्रव नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील परिसरात गेल्या काही दिवसांपासून पर्यटनासाठी येणाऱ्या तरुणांचा उपद्रव वाढला आहे. सुसाट वेगाने ...
त्र्यंबकेश्वर पर्यटनस्थळांवर तरुणांचा उपद्रव
नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील परिसरात गेल्या काही दिवसांपासून पर्यटनासाठी येणाऱ्या तरुणांचा उपद्रव वाढला आहे. सुसाट वेगाने दुचाकी चालविणे तसेच मद्यप्राशन करणे असे प्रकार स्थानिक नागरिकांना सहन करावे लागत आहेत. तरुण-तरुणींची गर्दी या परिसरात वाढल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
इंदिरानगर बोगद्यातील कोंडी कायम
नाशिक : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळून जाणाऱ्या बोगद्यातील वाहतुकीमुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. भाभानगरकडून येणाऱ्या वाहनधारकांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे, तर सिडकोकडून येणाऱ्या वाहनधारकांनादेखील चौकात उभे राहावे लागत असल्याने वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे इंदिरानगर चौकातील वाहतूक कोंडी कायम आहे.
प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थी अडचणीत
नाशिक : वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे कॅप राउंड सुरू झाले असले तरी अलॉटमेंट यादी जाहीर होण्यास विलंब होत असल्याने कोणत्या फॅकल्टीला प्रवेश घ्यावा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विशेषत: वैद्यकीय प्रवेशाच्या कोट्यातील यादी आणि अलॉटमेंट हे वेळापत्रकानुसार होत नसल्याने अनेक विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.