‘सातबारा’साठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 09:40 PM2019-07-18T21:40:29+5:302019-07-18T21:42:04+5:30

जोरण : बागलाण तालुक्यात खरीप पिकांचा पीकविमा भरणे चालू असून, अंतिम मुदत दि.२४ जुलै असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर गर्दी केली आहे. पीकविम्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी शेतकºयांची गर्दी वाढत आहे; परंतु नऊ गावांचा कारभार पाहण्यासाठी एकच तलाठी असल्यामुळे कार्यालयात गर्दी झाली आहे.

The crowd for 'Satbara' | ‘सातबारा’साठी गर्दी

किकवारी खुर्द येथे तलाठी कार्यालयाबाहेर सातबारा घेण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली गर्दी.

Next
ठळक मुद्देपीकविमा : नऊ गावांचा कारभार पाहण्यासाठी एकच तलाठी

जोरण : बागलाण तालुक्यात खरीप पिकांचा पीकविमा भरणे चालू असून, अंतिम मुदत दि.२४ जुलै असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर गर्दी केली आहे. पीकविम्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी शेतकºयांची गर्दी वाढत आहे; परंतु नऊ गावांचा कारभार पाहण्यासाठी एकच तलाठी असल्यामुळे कार्यालयात गर्दी झाली आहे.
बागलाण तालुक्यातील अनेक गावांमध्ये एका तलाठ्याकडे नऊ गावांचा कारभार पाहावा लागतो आहे. बागलाण तालुक्यातील जोरण व किकवारी खुर्द तलाठी कार्यालयाला एकच तलाठी आहे. तसेच जोरण तलाठी कार्यालय अंतर्गत जोरण, कपालेश्वर, देवपूर, विंचुरे, निकवेल तसेच किकवारी खुर्द येथील तलाठी कार्यालय अंतर्गत किकवारी खुर्द, किकवारी बुद्रुक, तळवाडे दिगर, भिलदर आदी गावांचा समावेश होतो. सध्या मात्र फळबाग डाळिंबाची मुदत संपली आहे. डाळिंबाचा पीकविमा भरण्यासाठी काही शेतकरी तालुक्यात वंचित राहिले. ऐन वेळेस कागदपत्रे जमवाजमवी करावी लागली. तात्या भेटले तर सातबारा काढण्यासाठी सर्व्हर डाउन अशा अनेक समस्या शेतकºयांपुढे आल्या तसेच खरीप मका, बाजरी, सोयाबीन आदी पिकांचा पीकविमा सध्या चालू आहे. यासाठी तालुक्याच्या ठिकाणी व तसेच ग्रामीण भागातील सायबर कॅफे यांच्यावर तालुक्यातील शेतकºयांनी गर्दी केली आहे.
शासनाने गेल्या काही वर्षांपासून तलाठी भरती केली नसल्यामुळे तालुक्यात एका तलाठ्यास नऊ-दहा गावांचा कारभार पाहावा लागत आहे तसेच शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात. योजनांसाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्याच्यावेळी कर्मचाºयांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. एका कर्मचाºयास नऊ गावांचा कारभार पाहावा लागतो व त्या कर्मचाºयावर अतिरिक्त भार येत असल्यामुळे कोणते काम करावे हेच त्या कर्मचाºयास सुचत नाही, असे तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.बागलाण तालुक्यातील काही गावांतील तलाठ्यास दोन सजांचे काम पहावे लागत आहे तसेच ऐन वेळेस आम्हाला सातबारा व काही कामांना नेहमी अडचणी येतात. शासनाने तलाठी भरती केली नसल्यामुळे एका तलाठ्यास नऊ ते दहा गावांचा कारभार पाहावा लागतो, यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी नवीन तलाठी भरतीची मागणी करावी व तलाठी यांच्यावर अतिरिक्त भार येत असून तो कमी होईल. - बाबाजी सावकार, शेतकरी

Web Title: The crowd for 'Satbara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.