देखावे पाहण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:36 AM2018-09-21T00:36:17+5:302018-09-21T00:36:42+5:30
येवला : यंदा गणेशोत्सवात देखावे कमी झाले असून धार्मिक, पौराणिक, सामाजिक या विषयांना यंदाच्या देखाव्यात मंडळांनी स्थान दिले असून, जिवंत देखाव्यावर जास्त भर दिसून येत आहे. सर्व मंडळाचे देखावे पाहण्यासाठी खुले झाले असून, सुटीची पर्वणी साधत देखावे पाहण्यास रस्ते रात्री उशिरापर्यंत गर्दीने फुलून जात आहे.
येवला : यंदा गणेशोत्सवात देखावे कमी झाले असून धार्मिक, पौराणिक, सामाजिक या विषयांना यंदाच्या देखाव्यात मंडळांनी स्थान दिले असून, जिवंत देखाव्यावर जास्त भर दिसून येत आहे. सर्व मंडळाचे देखावे पाहण्यासाठी खुले झाले असून, सुटीची पर्वणी साधत देखावे पाहण्यास रस्ते रात्री उशिरापर्यंत गर्दीने फुलून जात आहे.
येथील मंडळांनी यंदाही हलत्या देखाव्यापेक्षा सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे प्रसंग जिवंत देखाव्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गणेशभक्त गणरायाच्या दर्शनाकरिता बाहेर पडत असल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले आहे. गणरायाच्या भक्तिमय गाण्यांमुळे वातावरणही गणेशमय झालेले दिसून येत आहे. येवले शहरात ऐतिहासिक, पौराणिक आणि काल्पनिक विषयांवरील हलत्या व जिवंत देखावे सादर करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे.
शहरातील मंडळांकडून सादर केल्या जाणाऱ्या देखाव्यांचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. यावर्षी बाजारतळ येथील येवला बॉईज मंडळाचा गोरा कुंभाराची विठ्ठलभक्ती याचा जिवंत देखावा सादर केला, तर कासार युवा प्रतिष्ठान या मंडळाने अंधश्रद्धा कशी वाढत चालली असून, अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नका असा संदेश देणारा जिवंत देखावा सादर केला. शिवराजे ग्रुप मंडळाने बलशाली भीमाचे गर्वहरण याचा सजीव देखावा सादर केला, तर नवजवान मित्रमंडळाने शिशुपाल वध याचा जिवंत देखावा सादर केला. अशा अनेक मंडळांनी आपल्या गणरायापुढे देखावे सादर केले आहेत.आकर्षक गणेशमूर्तीऐतिहासिक, पौराणिक, प्रबोधनात्मक, काल्पनिक, सामाजिक सजीव देखावे साकारण्यात आले असून, देखावे पाहण्यासाठी येवलेकरांची गर्दी होत आहे.
याशिवाय काटे मारु ती तालीम संघ, शिवपुत्र गणेश मंडळ, गजराज फ्रेन्ड सर्कल आदी मंडळांतील आकर्षक गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. स्त्री भ्रूणहत्या, नारी सन्मान, शेतकºयांच्या आत्महत्या, दुष्काळ, वृक्षसंवर्धन हे विषय साकारले आहेत.