येवल्यात खरेदीसाठी गर्दी; नियमांची सर्रास पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:44 PM2020-04-26T23:44:02+5:302020-04-26T23:44:33+5:30
कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्वच येत्या बुधवारपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे, परंतु अक्षय्यतृतीया असल्याने करा-केळी, खरबूज व आंबे खरेदीसाठी शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या सर्वच नियमांची पायमल्ली झालेली दिसून आली.
येवला : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्वच येत्या बुधवारपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे, परंतु अक्षय्यतृतीया असल्याने करा-केळी, खरबूज व आंबे खरेदीसाठी शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या सर्वच नियमांची पायमल्ली झालेली दिसून आली. तर प्रशासनानेही यावर कोणतीही काळजी घेतली नसल्याचे दिसून आली.
शहरातील शनिपटांगणावर सकाळी घासविक्र ी वरून व्यापारी व शेतकरी वाद होता होता राहिला. यावेळी परिसरातील लोक जमा झाले होते. पुढे केशवराव पटेल मार्केट आवारात हातगाडीवर आंबे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अवघ्या पंधरा-वीस मिनिटांत विक्र ेत्याकडील आंबे संपले. त्यानंतर मेनरोडवर खरबूज विक्रीच्या हातगाड्यांवरही नागरिकांकडून खरबूज खरेदी सुरू होती, तर काही करा-केळी विक्रेतेही या ठिकाणी बसलेले दिसून आले.
याबरोबरच येवला-मनमाड महामार्गावर बनकर पेट्रोल पंपानजीकही आंबे खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली होती. जवळच करा-केळी, खरबूज विक्र ीही सुरू होती. फत्तेबुरूज नाका येथेही करा-केळी, खरबूज, आंबे विक्र ी सुरू होती तर गंगादरवाजाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही आंबे विक्र ीच्या हातगाड्या लागलेल्या होत्या. वसाहत भागांमध्येही करा-केळी, खरबूज, आंबे यांची ठिकठिकाणी विक्र ी झाली.
लॉकडाउन व संचारबंदीने आंबे व करा-केळीचे भाव यंदा दुप्पट-तिप्पट झाल्याचे दिसून आले. सर्वसाधारण ४० ते ५० रुपये किलोने विक्र ी होणारे आंबे यंदा शंभर ते सव्वाशे रुपये किलोने विकले गेले, तर साधारण ५० ते ६० रुपयांत मिळणारी करा-केळी यंदा सव्वाशे ते दीडशे रुपयांपुढे विकली गेली.