रानभाज्यांच्या खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:43 PM2018-09-18T12:43:01+5:302018-09-18T12:43:29+5:30
वणी : अनैसर्गिक पद्धतीने फळे व भाजीपाला परिपक्व करून विक्र ी करण्याकडे काही घटकांचा कल असताना याला छेद देत आदिवासी बांधवानी रासायनिक पदार्थाचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने उत्पादित रानभाज्या भाजीपाला विक्र ीसाठी उपलब्ध करून नैसर्गिक गुणवता कायम ठेवली आहे.
वणी : अनैसर्गिक पद्धतीने फळे व भाजीपाला परिपक्व करून विक्र ी करण्याकडे काही घटकांचा कल असताना याला छेद देत आदिवासी बांधवानी रासायनिक पदार्थाचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने उत्पादित रानभाज्या भाजीपाला
विक्र ीसाठी उपलब्ध करून नैसर्गिक गुणवता कायम ठेवली आहे. सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी अहिवंतवाडी परिसरालगत दरेगावच्या रस्त्यालगतच्या कठड्यावर आदिवासी महिला विविध प्रकारच्या रानभाज्या बरोबर इतरही गावठी पद्धतीने उत्पादित वस्तु विक्र ी करताना दिसून येतात. दिंडोरी व कळवण तालुक्याच्या सिमेवर असलेल्या या विक्र ी स्थळावर नमुद रानभाज्या व तत्सम भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. गडावर जाणारे भाविक या मार्गाने जाणारे पर्यटक प्रवासी या ठिकाणी थांबुन कुतुहलापोटी माहिती घेतात व रानभाज्या खरेदी करतात. जाईचा मोहोर, करटुले वाळका, काकडी, गावठी दोडके या व अशा विविध प्रकारच्या रानभाज्या ते खरेदी करतात. या रानभाज्या वाटा पद्धतीने तर करटुले किलोदराच्या पद्धतीने विक्र ी करण्यात येतात. विशेष म्हणजे सदर भाज्या या भागातच विक्र ीसाठी उपलब्ध आहेत, तसेच नैसर्गिक पद्धतीने उत्पादित होण्यासाठी आवश्यक असणारी जमिन पाणी हवामान तसेच रानभाज्यावर रोगराईची शक्यता नाही. तसेच उत्पादनवाढीसाठी व गुणवता टिकवुन ठेवण्यासाठी रासायनिक पदार्थ वापराची आवश्यकता नसल्याने सकस व दर्जेदार पद्धतीच्या रानभाज्या उत्पादित करण्यासाठी मेहनती व्यतिरिक्त अतिरिक्त आर्थिक खर्चाचा बोजा सहन करावा लागत नाही. अहिवंतवाडी घाटालगतच्या कठड्यावर रानभाज्यांची विक्र ी करून आदिवासी महिला चार पैसे कमवून आपल्या संसारास हातभार लावतात.