त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:26 AM2018-10-22T00:26:35+5:302018-10-22T00:27:23+5:30

त्र्यंबकेश्वर : दसरा संपला आणि त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी वाढु लागली. पितृपक्षात धार्मिक विधी करणाऱ्यांची गर्दी होती; पण पितृपक्ष संपला, नेहमीप्रमाणे नवरात्रात गर्दी होत नसते पण यावर्षी नवरात्रात देखील त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी होती.

The crowd for a visit at Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गर्दी

त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गर्दी

Next
ठळक मुद्दे वृद्ध लहान मुले आदींचा सहभाग लक्षणीय

त्र्यंबकेश्वर : दसरा संपला आणि त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी वाढु लागली. पितृपक्षात धार्मिक विधी करणाऱ्यांची गर्दी होती; पण पितृपक्ष संपला, नेहमीप्रमाणे नवरात्रात गर्दी होत नसते पण यावर्षी नवरात्रात देखील त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी होती.
शिर्डी साई संस्थानच्या शतकमहोत्सवी सोहळ्यात शिर्डीला आलेल्या लाखो भाविकांपैकी बरेचजण शिर्डीबरोबर त्र्यंबकेश्वरला देखील येत होते. त्यामुळे यावर्षी त्र्यंबकेश्वरलादेखील गर्दी वाढली आहे. तसेच सुट्यांच्या दिवशी तर येथे गर्दी ओसंडून वाहत होती. उत्तर महादरवाजावर गर्दी वाढली आहे. भाविकांची रांग थेट डॉ. आंबेडकर चौकाच्या पुढे जात आहे. सध्या तरी शांततेत दर्शन सुरू आहे. पूर्व गेटचा मंडप उघडल्याने भरउन्हात तगमगत भाविकांची रांगेत दर्शनासाठी प्रतीक्षा सुरू असते. त्यात वृद्ध लहान मुले आदींचा सहभाग लक्षणीय असतो.

Web Title: The crowd for a visit at Trimbakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक