समाज जागृतीसाठी गावफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 05:00 PM2020-01-22T17:00:27+5:302020-01-22T17:00:39+5:30
वडनेर भैरव ; येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजजागृतीसांक्ष गावफेरी काढली्यवडनेर भैरव मध्ये स्वामी विवेकानंद जयंती- युवा दिनाच्या निमित्ताने दि.१७ ते २४जानेवारी हा युवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या सप्ताहा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून विविध सामाजिक समस्यांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने वडनेर भैरव गावात गावफेरी काढण्यात आली होती. या गावफेरीत विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करणारे देखावे/ चित्ररथ साकारण्यात आले होते. यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या रोखा, हैद्राबाद येथील प्रियांका रेड्डी प्रकरण, वारकरी सांप्रदायिक आदर्श दिंडी, गडकिल्ले वाचवा, विविधतेत एकता-देशाची शक्ती !, महाराष्ट्राची लोकपरंपरा, शिक्षणाने केला समाजाचा उद्धार आदी विविध विषयांवरील चित्ररथ, देखावे सहभागी झाले होते.
गावातील ग्रामपंचायत समोर आणि शनिचौक येथे विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादरीकरण केले. मतदार राजा जागा हो- लोकशाहीचा धागा हो ! या रासेयो च्या स्वयंसेवकांनी सादर केलेल्या पथनात्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन मर्यादित न राहता घेतलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी समाज जागृतीसाठी वापर केला पाहिजे. समाजात जाऊन विविध विषयांचे सादरीकरण करण्याची क्षमता व योग्यता निर्माण व्हावी यासाठी आमचा हा गावफेरी उपक्र म असतो , असे मत यावेळी प्राचार्य ए एल भगत यांनी व्यक्त केले.
प्रा ज्ञानेश्वर भगुरे यांनी या गावफेरीचे संयोजन केले. महाविद्यालयाचे सर्वच प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी या गावफेरीत आवर्जून सहभागी झाले होते