बाजार समितीत गर्दीचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 04:33 PM2020-06-12T16:33:59+5:302020-06-12T16:37:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पंचवटी : शहरात विशेषत: पंचवटी परिसरात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत असताना ...

Crowding planning in the market committee collapsed | बाजार समितीत गर्दीचे नियोजन कोलमडले

बाजार समितीत गर्दीचे नियोजन कोलमडले

Next
ठळक मुद्देवाहनांच्या रांगा सायंकाळचे लिलाव दुपारीच

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : शहरात विशेषत: पंचवटी परिसरात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत असताना दुसरीकडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रोजच शेतकरी, खरेदीदारांची मोठी गर्दी होत असल्याने कोरोनाची साखळी आणखी घट्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या गाजर, मिरची तसेच घेवडा यांसह अन्य फळभाज्यांचे लिलाव दुपारच्या सत्रात करण्यात आल्याने नियोजन पूर्णपणे कोलमडून पडले असून, बाजार समितीत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
नाशिक बाजार समितीत व्यापारी, बाजार समिती पदाधिकारी, हॉटेल चालक आणि अन्य काहींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याने बाजार समिती काही दिवसांपूर्वी तीन दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीने नियोजन करणे आवश्यक होते. मात्र त्यात कोणताही फरक पडला नाही. गर्दीचे नियोजन तसेच बाजार समितीत येणाऱ्या व्यक्तींची तपासणी आदी बाबींबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे बाजार समितीत कोरोनाचे रुग्ण वाढून त्याचे लोण ग्रामीण भागात पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी पुन्हा एकदा बाजार समितीचे नियोजन कोलमडल्याचे स्पष्ट झाले. सध्या पावसाचे वातावरण तयार झाल्याने त्याचबरोबर गेल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळ आल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला तयार भाजीपाला आणण्यास सुरुवात केली असून, शुक्रवारी सकाळपासूनच बाजार समितीत व बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या. अशातच भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनीही चांगला भाजीपाला खरेदी करण्यासाठी शेतक-यांशी बोलणी करून लिलावाला सुरुवात केली. अशातच किरकोळ भाजीपाला खरेदी करणाºयांचीही गर्दी झाल्याने बाजार समितीतील गर्दीचे नियोजन कोलमडले. वाहने आत-बाहेर जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार त्यातही नियोजन नसल्याने किती तरी वेळ वाहनांच्या रांगा कायम होत्या. दरम्यान, दुपारी २ वाजता पावसाला सुरुवात होताच, बाजार समितीत एकच धावपळ उडाली. भाजीपाला विक्रेते व खरेदीदारांनी पावसापासून माल बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

Web Title: Crowding planning in the market committee collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.