ग्रामीण भागात मद्यपींची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:59 PM2020-05-11T21:59:55+5:302020-05-11T23:31:11+5:30
येवला : लॉकडाउनच्या अंतिम टप्प्यात तालुक्यातील ग्रामीण भागात देशी मद्य दुकाने व बिअर शॉपी सुरू झाल्याने मद्य खरेदीसाठी तळीरामांची या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.
येवला : लॉकडाउनच्या अंतिम टप्प्यात तालुक्यातील ग्रामीण भागात देशी मद्य दुकाने व बिअर शॉपी सुरू झाल्याने मद्य खरेदीसाठी तळीरामांची या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने संपूर्ण येवला शहरच कंटेन्मेंट झोन झाले असल्याने शहरातील मद्याची दुकाने बंदच आहेत; मात्र तालुक्यातील ग्रामीण भागातील अंदरसूल, नगरसूल व राजापूर येथील देशी मद्याची दुकाने, बिअर शॉपी मात्र सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातील या मद्य दुकानांवर तळीरामांच्या मद्य खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागत असून, मोठी गर्दीही दिसून येत आहे. शहरातील अनेक मद्यशौकीन ग्रामीण भागातील या मद्य दुकानांवरील रांगांमध्ये दिसून येत आहेत. विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग पाळून शिस्तीत मद्य विक्री सुरू आहे. मद्यविक्र ी दुकानांवर प्रत्येक ठिकाणी एक कर्मचारी मद्यखरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचे तापमान घेत आहे. मद्य खरेदीसाठी टोकन दिले जात असून, ग्राहकाला मास्क वापरणे आवश्यक आहे.
मद्यदुकानातील कर्मचारीही हातमोजे, सॅनिटायझरचा वापर करत असून, ग्राहकांनाही सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जात आहे. मद्यदुकानांचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण केला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एस. वाय. श्रीवास्तव, उपनिरीक्षक पी. डी. कुडवे आणि सहकारी मद्यविक्र ीवर लक्ष ठेवून आहेत.