कोरोनाच्या प्रकोपात विजेने थोपविली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:03 AM2020-06-19T00:03:06+5:302020-06-19T00:27:12+5:30

मार्च-एप्रिल महिन्याच्या काळात कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबरोबरच संचारबंदी लागू करण्याची वेळ शासनावर आली. असे असले तरी नागरिकांना घरातच थोपवून धरण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या महावितरणने बजविलेल्या भूमिकेमुळे लॉकडाऊन सुसह्य झालाच शिवाय घराबाहेर पडण्याची वेळ नागरिकांवर आली नाही.

Crowds choked by lightning in Corona's outburst | कोरोनाच्या प्रकोपात विजेने थोपविली गर्दी

कोरोनाच्या प्रकोपात विजेने थोपविली गर्दी

Next
ठळक मुद्दे१६००० मेगावॉट अविरत वीज : विजेमुळे नागरिकांचा लॉकडाऊन सुसह्य

नाशिक : मार्च-एप्रिल महिन्याच्या काळात कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबरोबरच संचारबंदी लागू करण्याची वेळ शासनावर आली. असे असले तरी नागरिकांना घरातच थोपवून धरण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या महावितरणने बजविलेल्या भूमिकेमुळे लॉकडाऊन सुसह्य झालाच शिवाय घराबाहेर पडण्याची वेळ नागरिकांवर आली नाही.
प्रशासकीय पातळीवर शासन कोरोनाशी लढताना नागरिकांनी घरातच राहून कोरोनाच्या युद्धात सहभागी होण्याचे आवाहन केले जात होते. शासनाच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला असला तरी त्यांना घरातच थोपवून धरण्यासाठी महावितरणने अप्रत्यक्ष भूमिका बजाविली. शासनाने महावितरणकडे विशेष जबाबदारी देऊन अविरत वीजपुरवठा करणे अत्यावश्यक केल्याने महावितरणनेही कारोना योद्धाची भूमिका बजाविली. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यासाठी महावितरणने पोस्टरद्वारे जनजागृतीही केली.
४लॉकडाऊनमुळे औद्योगिक आणि वाणिज्यिक मागणी कमी झाल्याने राज्याच्या विजेच्या मागणीत घट झाली, मात्र हीच वीज घरगुती ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली.
४वीजेमुळे वर्क फ्रॉम होम, संगणकावर मुले खेळू शकली, रुग्णालयातील उपचारासाठी लागणारी वीजही उपलब्ध होऊ शकली. घरातील वीजेवर चालणारी कामे करता आली.
४अत्यावयक सेवेतही महावितरणची भूमिका निर्णायक ठरली. वीज उपलब्ध नसती तर लोक घरी थांबू शकले नसते किंबहूना नागरिकांना घरी थांबविण्यात महावितरणची मोलाची भूमिका राहिली.

Web Title: Crowds choked by lightning in Corona's outburst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.