निर्बंध शिथिल होताच नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:08+5:302021-06-02T04:12:08+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्याची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात मंगळवारी मिनी बाजाराच्या दिवशी वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली ...
घोटी : इगतपुरी तालुक्याची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात मंगळवारी मिनी बाजाराच्या दिवशी वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेली अंशतः शिथिलता, पावसाळ्यापूर्वी वस्तूंची खरेदी करणेकामी मंगळवारचा मिनी बाजार असलेल्या घोटी शहरात सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्वच यंत्रणेने डोळेझाक केल्याचे चित्र दिसत होते.
गेल्या दोन महिन्यांपासून कोविड प्रादुर्भावामुळे बहुतेक सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यामुळे आज लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्याने घोटी बाजारपेठेतील सर्वच दुकाने उघडल्याने ग्राहकांचीही गर्दी झाली होती. त्यात घोटीत मंगळवारी मिनी बाजार असल्याने गर्दीत वाढ झाल्याचे चित्र दिसत होते. इगतपुरी तालुका आदिवासी व दुर्गम भाग असल्याने घोटी बाजारपेठेत खरेदी-विक्रीसाठी ग्राहकांची वर्दळ असते. त्यात पावसाळापूर्व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. खते, बी-बियाणे, धान्य खरेदी, प्लास्टिक खरेदी, घरदुरुस्ती व घरबांधणीचे साहित्य खरेदी, तसेच मिरची दळण या पावसाळी साहित्याची खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होते. त्यात खरेदी-विक्रीसाठी दुपारी दोन वाजेपर्यंतच वेळेची मर्यादा असल्याने ही गर्दी वाढत असल्याचे सांगितले जाते.
-----------------------
पावसाळापूर्व साहित्यासाठी गर्दी
शिथिल झालेले निर्बंध, पावसाळापूर्व साहित्याची खरेदी, तसेच शेतीच्या साधनांच्या खरेदीसाठी घोटीत गर्दी होत असली तरी, नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोणत्याही दुकानात खरेदीसाठी जाताना तोंडाला मास्क लावणे क्रमप्राप्त आहे, तर गर्दी होणार नाही याची दखल दुकानदारांनी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने गर्दीत वस्तूंची खरेदी करणे हे धोकादायक असल्याने सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. (०१ घोटी)
===Photopath===
010621\01nsk_23_01062021_13.jpg
===Caption===
०१ घोटी १