डिस्टन्सकडे दुर्लक्ष करीत मेनरोडला ग्राहकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:28 AM2020-05-18T00:28:47+5:302020-05-18T00:29:08+5:30
कोरोनापूर्वीच्या काळातील कोणत्याही सामान्य रविवारप्रमाणे कालदेखील नाशिकच्या मुख्य बाजारपेठांसह रस्त्यांवर तुफान गर्दी दिसत होती. नागरिक किराणामालापासून कपडा खरेदीपर्यंत सर्वच दुकानांवर रांगा लावून तर अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही भान न बाळगता झुंबड केल्याचे दिसून येत होते. संचारबंदी पूर्णपणे संपुष्टात आल्यासारखे भासावे, असेच दृश्य महानगरात रविवारी दिसून आले.

४नाशकात मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून प्रारंभ झालेल्या संचारबंदीत प्रारंभीचा दीड महिना नागरिकांनी आणि पोलीस प्रशासनानेदेखील त्याचे काटेकोरपणे पालन केले. मार्चअखेरपासून बंद
रविवारी तर मुख्य बाजारपेठेत जवळपास प्रत्येक दुकानात नागरिकांची खरेदी सुरू होती. त्यामुळेच हा रविवार नागरिकांसाठी जणू अन्य सामान्य रविवारसारखा ‘सुपर खरेदी संडे’ ठरला. काही वेळा तर बाजारपेठेत ट्रॅफिक जॅमचा अनुभवदेखील नागरिकांना अनुभवायला मिळाला. त्यामुळे देशपातळीवर आणि राज्यातही चौथ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असली तरी नाशिकमध्ये जणू तिसऱ्या लॉकडाउनच्या अखेरच्या दिवशी लॉकडाउनच संपल्याप्रमाणे चित्र पूर्ण दिवसभर दिसत होते.असलेली दुकाने आणि कार्यालये बहुतांश उघडलेच आहेत. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे शनिवारी आणि रविवारी दिसून आले.