रविवारच्या सुट्टीमुळे पांडवलेणी परिसरात उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:53 PM2020-10-11T23:53:59+5:302020-10-12T01:20:16+5:30
नाशिक : कोरोनामुळे गेले पाच ते सहा महिने घरात बंदिस्त राहिलेले नाशिककर आता घराबाहेर पडू लागले असून अनेक नशिककरांनी साप्ताहिक सुट्टीची संधी साधत रविवारी फाळके स्मारक , पांडवलेणी परिसरात गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे याभागात वाहनाच्या अक्षरश: रांगा रागल्या होत्या.

जगभरात थैमान घालणाऱ्या करुणा नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना सामान्य नागरीक मात्र त्याविषयी गांभिर्य दाखवत असल्याचे चित्र परिसरात लागलेल्या वाहनांच्या रंगामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. देशात अनलॉक ची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सरकारने कोरणा पासून बचावासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घरापासून बाहेर पडू नये असे आव्हान केले आहे मात्र नाशिककर याबाबत गंभीरे दाखवत असल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. फालके स्मारक परिसरात रविवारी सकाळी शेकडो वाहनांमधून नागरिक गिर्यारोहन व फेरफटका मारण्यासाठी जमल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यात सायकल, दुचाकी, चारचाकी आणि पायी चालत येणाºया नागरिकांचाही मोठया प्रमाणात समावेश असल्याने त्यातून संसर्ग वाढण्याची भीती आहे.
फाळके स्मारक परिसर्त गर्दी होत असतानाही पोलीस प्रशासन, महानगरपालिका अथवा आरोग्य विभाग यापैकी कोणीही प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेली नाही. उलट याभागात येणारे काही नागरिक साध्या मास्कचाही वापर करीत नसल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान या भागात फिजिकल डिस्टन्स आणि मास्क सक्तीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.