टोकन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 02:03 PM2020-04-06T14:03:11+5:302020-04-06T14:03:46+5:30
उमराणे : कोरोनामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेल्या उमराणे बाजार समितीत शासनाच्या आदेशान्वये मंगळवारपासून (दि. ७) कांदा लिलाव पुर्ववत सुरु करण्यात येणार आहे.
उमराणे : कोरोनामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेल्या उमराणे बाजार समितीत शासनाच्या आदेशान्वये मंगळवारपासून (दि. ७) कांदा लिलाव पुर्ववत सुरु करण्यात येणार आहे. बाजार समितीकडून पाचशे शेतकऱ्यांना टोकन वाटप करण्यात आले असून टोकन मिळविण्यासाठी शेतकºयांनी गर्दी केली होती. गर्दी टाळण्यासाठी एका दिवसात फक्त पाचशे ट्रॅक्टर वाहनांचाच लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडुन देण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गर्दी टाळण्यासाठी कांदा लिलाव बंद करण्यात आले होते. त्यामुळे याकाळात कांदा उत्पादक शेतकर्यांची माल विक्र ीसाठी हेळसांड होत होती. तर काही शेतकरी व्यापार्यांना दर ठरवुन कांदा विक्र ी करत होते. सद्यस्थितीत लाल व उन्हाळी कांदा काढणीला आल्याने कांदा विक्र ीसाठी शेतकर्यांची अडचण व इतर ठिकाणी कांद्याचा तुटवडा जाणवू नये यासाठी शासनाने बाजार समित्या सुरु करण्याचा निर्णय घेतला असुन त्या अनुषंगाने उमराणे बाजार समतिीत कांदा लिलाव पुर्ववत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समतिीचे प्रशासक सुजेय पोटे यांनी दिली आहे.