उमराणेत कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 03:16 PM2019-10-18T15:16:22+5:302019-10-18T15:20:05+5:30
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कमी झाले असुन बाजारभाव ...
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कमी झाले असुन बाजारभाव अजुन कमी होतील की काय या भितीपोटी तसेच कांद्याची प्रतवारीही घसरु लागल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केली आहे. परिणामी कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. मागील वर्षी दसरा व दिवाळीनंतर लाल ( पावसाळी) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने उन्हाळी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. परंतु चालुवर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्याने लाल कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम झाला असुन प्रतिकुल परिस्थितीवर मात करत काही शेतकºयांनी लाल कांद्याची लागवड केली होती. परंतु लागवड केलेल्या कांद्यानाही परतीच्या पावसाने झोडपल्याने काही प्रमाणात येणारा कांदाही खराब झाल्याने बाजारात येऊ शकला नाही. शिवाय नविन कांदा लागवडीसाठी टाकलेले रोपेही खराब झाल्याने लाल कांदा उत्पादन धोक्यात आले असतानाच नविन लागवड झालेल्या लाल रांगडा कांदा बाजारात येण्यासाठी अजुन एक महिना वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.परंतु गेल्या तिन आठवड्यापूर्वी पाच हजारो गाठलेल्या उन्हाळी कांद्याचे दर त्यानंतर दिवसेंदिवस कमी कमी होत २७०० रु पयांपर्यंत येऊन ठेपले असुन गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याची प्रतवारी घसरु लागल्याने मिळेल त्या भावात कांदा विक्र ीवर शेतकर्यांनी भर दिला आहे. त्यामुळे बाजारात कांदा आवकेत वाढ झाली आहे. मागणी व पुरवठा याचे व्यस्त प्रमाण झाल्याने व सद्यस्थिती इतर राज्यातून मागणी कमी होऊ लागल्याने कांद्याचे बाजारभाव दररोज कमी कमी होत असल्याचे चित्र आहे.
-------------------------
चालू आठवड्यात उमराणे बाजार समितीतील कांद्याची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे मंगळवार दि.१५, आवक - ११६१४ क्विंटल, बाजारभाव ३२०० रु पये, बुधवार दि.१६, आवक १५६७३, बाजारभाव ३००० रु पये, @ गुरु वार दि.१७, आवक १७७८५, बाजारभाव २७५२ रु पये, @ शुक्र वार दि.१८, आवक १६५००, बाजारभाव २७०० रु पये