पूर्व भागात मोफत तांदूळ घेण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:56 PM2020-04-16T21:56:05+5:302020-04-17T00:25:14+5:30
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक ठिकाणी रेशन दुकानांमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वाटप सुरू असल्याने लाभार्थ्यांनी गर्दी केली आहे.
शरदचंद्र खैरनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक ठिकाणी रेशन दुकानांमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वाटप सुरू असल्याने लाभार्थ्यांनी गर्दी केली आहे. मात्र अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नाही, तर काहीजण मास्क न लावताच रांगेत उभे असलेले आढळून आले आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागातील लाखलगाव येथील रेशन दुकान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत चालविले जाते. याठिकाणी पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत तांदूळ घेण्यासाठी गर्दी झाल्यामुळे अनेकांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याने ग्रामविस्तार अधिकारी कल्पेश बरू यांनी ग्रामपंचायतीमार्फत दोन जणांना प्रत्येकी पाचशे रु पये तर मास्क न लावता आलेल्या एकास दोनशे रु पये दंडाची आकारणी करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. बहुधा कोरोनाविषयीच्या नियमांची पायमल्ली केलेल्यांना दंड ठोठावण्याची ही पहिलीच घटना असावी.
एकलहरे परिसरातील रेशन दुकानदार व कार्डधारकांच्या नेहमीच काहीना काही तक्र ारी असतात. रेशनबाबत दुकानदारांनी गैरव्यवहार करू नये यासाठी शासनाच्या एका लिंकवर मिळणाऱ्या रेशनबाबत माहिती देण्यात येते.
रेशनबाबत कार्डधारकांच्या काही तक्र ारी असतील तर तलाठी जी. एच. भुसारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे.
दरम्यान, पूर्व भागातील मोफत तांदूळ वाटप मोहिमेवर एकलहरेचे तलाठी जी. एच. भुसारे, सामनगावचे तलाठी गोविंद चौधरी, जाखोरीचे तलाठी किशोर बाचकर, ग्रामसेवक उत्कर्ष पाटील, ज्ञानेश्वर भोर, के. एम. बरू, बापू पवार, सुरेश वाघ, दौलत गांगुर्डे आदींसह सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांची समिती लक्ष ठेवून आहे.